28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषहार्दिक पांड्याचे समर्थनासाठी रविचंद्रन अश्विन मैदानात

हार्दिक पांड्याचे समर्थनासाठी रविचंद्रन अश्विन मैदानात

Google News Follow

Related

हार्दिक पांड्या कोणत्या ना कोणत्या विषयाने चर्चेत असतो. आयपीएल २०२४ च्या स्पर्धा सुरू होण्याअगदोर मुंबईचे चाहते हार्दिकला ट्रोल करत आहेत. रोहीतचा कर्णधार पदावरून पायउतार करत मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची माळ हार्दिकच्या गळ्यात घातली. कर्णधार झाल्यानंतर हार्दिकला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. आयपीएल २०२४ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांत हार्दिक पंड्या ट्रोल होत आहे. यात आता रविचंद्रन अश्विनने उडी घेत मुंबईच्या कर्णधाराचे समर्थन करत असे पहिल्यांदाच घडत नसल्याचे म्हटलेले आहे.

अश्विनने कर्णधारपदाचा खेळ समजावून सांगितला. युवा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखा दिग्गज खेळाडू कसा खेळला हे त्याने सांगितले. अश्विन म्हणाला की, वरिष्ठ खेळाडू ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली खेळण्याची ही पहिली वेळ नाही. जर तुम्हाला एखादा खेळाडू आवडत नसेल आणि त्या खेळाडूचा तिरस्कार असेल, तर एखाद्या संघाने येऊन ते का समजावून सांगावे?

आपण असे का दाखवत आहोत, जसे यापूर्वी कधीच घडले नव्हते. सचिन गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळला आणि ते दोघेही राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले. हे तिन्ही खेळाडू अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळले आणि हे सर्व खेळाडू एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले. जेव्हा हे खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले, तेव्हा अनेक दिग्गज खेळाडू त्याच्या संघात होते.

हेही वाचा :

इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम

इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी

डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली; मॅट हेन्रीची एण्ट्री

विराट कोहलीची रिंकू सिंगला बॅट भेट

हार्दिक पंड्या द्वेषाचा बळी

आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्समध्ये खरेदी केले होते. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईने हार्दिकला कर्णधार बनवण्याची घोषणा केली. जी चाहत्यांना अजिबात आवडली नाही. आयपीएल २०२४ च्या सुरुवातीपासूनच चाहते हार्दिक पांड्याचा तिरस्कार करत आहेत. मैदानातील चाहते स्टँडवरून हार्दिक पांड्यावर जोरदार टीका करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा