29.1 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरविशेषमधुमेहींसाठी दिलासा! आठवड्यातून एकदाच घेण्याचे ‘अविक्ली’ इन्सुलिन भारतात लॉन्च

मधुमेहींसाठी दिलासा! आठवड्यातून एकदाच घेण्याचे ‘अविक्ली’ इन्सुलिन भारतात लॉन्च

दररोजच्या इंजेक्शनमधून सुटका

Google News Follow

Related

भारतातील मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. डॅनिश औषधनिर्माता कंपनी नोवो नॉर्डिस्कने भारतात ‘अविक्ली’ (Awiqli – Insulin Icodec) हे जगातील पहिले आठवड्यातून एकदाच घेण्याचे बेसल इन्सुलिन बाजारात आणले आहे. हे इन्सुलिन टाइप-१ आणि टाइप-२ मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी उपलब्ध असून, त्यामुळे दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची गरज कमी होणार आहे.

यापूर्वी इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांना वर्षभरात सुमारे ३६५ इंजेक्शने घ्यावी लागत होती. मात्र, ‘अविक्ली’मुळे ही संख्या केवळ ५२ इंजेक्शनपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा मानसिक ताण कमी होण्यासोबतच उपचार नियमितपणे सुरू ठेवण्यासही मदत होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

भारतात मधुमेहाचे वाढते संकट

भारत हा जगातील सर्वाधिक मधुमेही रुग्ण असलेल्या देशांपैकी एक आहे. कंपनीच्या माहितीनुसार, देशात १० कोटींहून अधिक नागरिक मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर सुमारे १३.६ कोटी नागरिक प्री-डायबेटीस अवस्थेत आहेत. इंजेक्शनची भीती, वेदना आणि खर्च यामुळे अनेक रुग्ण इन्सुलिन उपचार सुरू करण्यास सरासरी ७ ते ९ वर्षांचा विलंब करतात. त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढण्याचा धोका निर्माण होतो.

‘अविक्ली’चे वैशिष्ट्य काय?

‘अविक्ली’ हे दीर्घकालीन परिणाम करणारे (Long-acting Basal Insulin) इन्सुलिन आहे. ते शरीरात संपूर्ण आठवडाभर आवश्यक प्रमाणात इन्सुलिनची पातळी कायम ठेवते. हे औषध पेन डिव्हाइसद्वारे दिले जाते, त्यामुळे ते वापरणे तुलनेने सोपे आहे. यापूर्वी या औषधाला अमेरिका, युरोपियन युनियनसह अनेक देशांमध्ये मंजुरी मिळाली असून आता भारतातही ते उपलब्ध झाले आहे.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियातून भारतात युरेनियम आयातीचा मार्ग मोकळा

भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या चाबहार बंदरावर अमेरिकेचा हल्ला

“शिंदेंच्या दालनात बैठक घेऊन शरद पवारांनी गद्दारांना प्रतिष्ठा दिली”

मुंबईतील प्रसिद्ध ‘के रुस्तम’ आइसक्रीम ब्रँडचे फूड लायसन्स निलंबित

नोवो नॉर्डिस्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिया यांनी सांगितले की, आठवड्यातून एकदाच इन्सुलिन घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांच्या मनातील इंजेक्शनची भीती आणि मानसिक अडथळे कमी होतील. त्यामुळे अधिक रुग्ण वेळेवर इन्सुलिन उपचार सुरू करतील आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल.

तज्ज्ञांचा सल्ला

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हे औषध मधुमेहावरील उपचारात महत्त्वाचे पाऊल असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही रुग्णाने स्वतःहून दररोजचे इन्सुलिन बंद करून ‘अविक्ली’ सुरू करू नये. प्रत्येक रुग्णाची प्रकृती, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि उपचारपद्धती वेगळी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच इन्सुलिनमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा