32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरविशेषपंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, कुंभमेळ्याविषयी महत्वाचा निर्णय

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, कुंभमेळ्याविषयी महत्वाचा निर्णय

Google News Follow

Related

हरिद्वार येथे सुरु असणारा कुंभ मेळा मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरू शकतो. ही बाब लक्षात घेत आरोग्य अधिकारी ते थेट राजकीय नेते मंडळींपर्यंत सर्वांनीच कुंभ मेळा प्रतिकात्मक स्वरुपात साजरा का केला जात नाही? हा प्रश्न उपस्थित केला आहे. पण, आता मात्र साधुसंतांनीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णय़ाचं सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

साधुसंतांच्या या निर्णय़ानुसार आता इथं मोठ्या स्वरुपात गर्दी उसळणार नसून विविध आखाड्यांचे प्रतिनिधीच गंगा स्नान करत कुंभ मेळा पूर्णत्वास नेणार आहेत. पुढील आणि शेवटचं शाही स्नान २७ एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आहे. हा दिवस अमृत योग मानला जात असल्यामुळं त्या दिवशी हरिद्वारमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसणळण्याची शक्यता आहे. याआधी २१ एप्रिललाही एक शाही स्नान पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी कुंभ मेळ्यामध्ये १३ आखाडे सहभागी झाले आहेत. ज्यापैकी निरंजनी आणि आनंदी आखाड्यानं १७ एप्रिललाच कुंभ समाप्ती झाल्याचं जाहीर करत आपला तळ या ठिकाणहून हलवण्यास सुरुवात केली. आता याचंच अनुकरण इतर सर्व आखाडे करतात का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस

मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी

गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?

… कारण ठाकरे सरकार निकम्मे आहे!

दरम्यान, देशात एकीकडे कोरोनाचा उद्रेक सुरु असताना हरिद्वारमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवत कुंभमेळ्याचं आयोजन सुरु होतं. परिस्थिती पाहता, खुद्द देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केलं. कोरोनाचा उद्रेक होत असतानाही प्रचंड गर्दीत साजरा होणाऱ्या कुंभमेळ्यावर अखेर पंतप्रधानांनी मौन सोडलं. कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा करा, असं आवाहन मोदींनी केलं आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनातले एक महत्वाचे संत आचार्य महामंडलेश्वर यांच्याशी पंतप्रधानांनी सकाळी फोनवरुन चर्चाही केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा