33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषरोनाल्डोची घरवापसी

रोनाल्डोची घरवापसी

Google News Follow

Related

पोर्तुगाल संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक क्रिस्तियानो रोनाल्डो हा स्वगृही परतत आहे. रोनाल्डो हा इटली मधल्या युवेंटस संघाला रामराम ठोकत आहे. तर पुन्हा एकदा इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये खेळण्यास सज्ज झालाय आहे आणि ते सुद्धा त्याचा जुना संघ मॅंचेस्टर युनायटेड कडून! त्यामुळेच आता रोनाल्डोची घरवापसी झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.

जगभरातील फुटबॉल लीग्स मध्ये सध्या ट्रान्सफर सीजन अर्थात बदल्यांचा हंगाम सुरू आहे. २०२१ चा हा हंगाम बऱ्याच अर्थाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरत आहे. आधी लियोनेल मेस्सी याने बार्सिलोनाचा निरोप घेत फ्रेंच लिग मधील पॅरिस सेंट जर्मन संघासोबत करार केला. तर आता क्रिस्तियानो रोनाल्डो हा मॅन्चेस्टर युनायटेड संघासोबत करारबद्ध होऊन स्वगृही परतला आहे. जगभरातील फुटबॉल रसिकांसाठी आणि मॅन्चेस्टर युनायटेड संघाच्या चाहत्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब ठरत आहे. सोशल मीडियावरही त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासूनच रोनाल्डो युवेंटस संघाला अलविदा म्हणणार असल्‍याची चर्चा सुरु झाली होती. शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत रोनाल्डोला करारबद्ध करण्यासाठी मॅंचेस्टर सिटी हा फुटबॉल क्लब प्रयत्नशील असल्याचे समजत होते. पण अचानक नाट्यमयरित्या मॅंचेस्टर युनायटेडने रोनाल्डोला परत मिळवण्यासाठीचा करार पुर्ण झाल्याचे घोषित केले. ‘वेलकम होम’ असे म्हणत मँचेस्टर युनायटेडच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही घोषणा करण्यात आली.

हे ही वाचा:

अमेरिकेने घेतला १३ जवानांचा बदला

नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल

अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे

…म्हणून सध्या चवदार तळे आहे चर्चेत

आपल्या कारकिर्दीत तब्बल पाच वेळा मानाचा ‘बॅलोन दि ओर’ पुरस्कार जिंकणारा रोनाल्डो हा सुरुवातीची काही वर्ष मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळत होता. याच काळात त्याचा खेळ अधिक बहरला आणि तो एक स्टार फुटबॉलपटू म्हणून नावारूपाला आला. मॅन्चेस्टर युनायटेड सोबत त्याने एकूण २९२ सामने खेळले असून ११८ गोल्स नोंदवले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा