29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषकैलास मानसरोवर भारताचे आहे, ते भारताचेच असले पाहिजे

कैलास मानसरोवर भारताचे आहे, ते भारताचेच असले पाहिजे

आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

कैलास मानसरोवर भारताचे आहे आणि ते भारताचेच असले पाहिजे. हीच भारताची मुख्य धारणा आहे. चीनने कोविड नावाचा व्हायरस तयार केला आणि ८,००,०००लाख लोकांचा बळी घेतला. त्याचवेळी भारत संरक्षक म्हणून पुढे आला. चीनसाठी भारत हे सर्वात मोठे आव्हान आहे असे मत ज्येष्ठ प्रचारक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केलं आहे. इंद्रेश कुमार शनिवारी जम्मूमध्ये पोहोचले. येथे त्यांनी प्रथम लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील आरोग्य सेवांबद्दल चर्चा केली.

पत्रकारांशी संवाद साधताना इंद्रेश कुमार यांनी चीनसोबतच पाकिस्तानलाही लक्ष्य केले. इंद्रेश कुमार म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तानमध्ये असा एकही आठवडा गेला नाही जो शांततेत गेला असेल. पाकव्याप्त काश्मीर आणि कैलास मानसरोवर भारतात मिळावेत यासाठी मी सर्वसामान्य जनतेला दररोज प्रार्थना करण्याचे आवाहन करतो असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

मोरबी दुर्घटनेत मदतीसाठी गेले आणि मिळाले स्वतःच्याच मुलांचे मृतदेह

नवाब मलिक यांची एवढी संपत्ती होणार जप्त

मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन रीयुनाईट’ची यशस्वी कामगिरी

भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण

काश्मिरी पंडितांचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. खोऱ्यातील नेत्यांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनावर काश्मिरी नेते कोणतेही वक्तव्य करत नाहीत. काश्मीरमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगवर हे लोक कोणतेही वक्तव्य करत नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केली. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. हे अत्याचार केवळ हिंदू आणि शीखांवरच होत नाहीत, तर इतर धर्माच्या लोकांवरही होत आहेत. इस्लाम धर्मातील अल्पसंख्याक गटांवरही पाकिस्तानमध्ये सातत्याने अत्याचार होत आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा