29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषरा. स्व. संघाचे प्रचारक संदीप आठवले यांचे अकाली निधन

रा. स्व. संघाचे प्रचारक संदीप आठवले यांचे अकाली निधन

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक संदीप आठवले यांचे आज सकाळी निधन झाले. संघाच्या रचनेत परळ विभागाचे विभाग प्रचारक या भूमिकेत ते काम करत होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे अनेक संघ स्वयंसेवक आणि कार्यकर्ते हळहळले आहेत. दिनांक २९ ॲाक्टोबर रोजी परळ विभाग प्रचारक संदीप आठवले यांना मेंदूत रक्तस्राव झाल्याने गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.  त्यांच्या या जाण्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपरिमीत हानी झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात लाखो स्वयंसेवक आहेत, परंतु यातील सगळेच कार्यकर्ते होत नाहीत. परंतु तरीही हजारो कार्यकर्त्यांपैकी केवळ काहीशे कार्यकर्तेच पूर्णवेळ कार्यकर्ते किंवा प्रचारक म्हणून जवाबदारी स्वीकारतात. संघाच्या अनेक कामांसाठी अनेक उपक्रमांसाठी संघाला आणेल पूर्णवेळ कार्यकर्त्यांची गरज असते. संघाचे पूर्णवेळ प्रचारक ही गरज पूर्ण करतात. त्याचबरोबर संघाच्या कामाचा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि काहीवेळा देशाबाहेरही विस्तार व्हावा याची जवाबदारीही वेगवेगळ्या प्रचारकांकडे असते. संघासाठी तन, मन, धन अर्पण करून निःस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी म्हणजेच प्रचारक. आणि अशा या प्रचारकांमध्येही खूप कमी प्रचारक असे असतात जे आयुष्यभर संघाचे प्रचारक राहून आपल्या आयुष्यच संघ कामामध्ये अर्पण करतात. यातलेच एक होते ते संदीप आठवले. उत्तम समन्वय आणि सहज संपर्क हे त्यांचे महत्वाचे गुण होते, असं त्यांचे सहकारी आणि स्नेही सांगतात.

हे ही वाचा:

अहमदनगरमध्ये रुग्णालयात आग लागून १० जणांचा मृत्यू

कच्च्या तेलापाठोपाठ आता खाद्य तेलही झाले स्वस्त

आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

अशा प्रचारकांच्या अकाली जाण्यामुळे संघाची आणि संघकार्याची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आठवले यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवकांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग किल्ला फिरताना जी काही अभूतपूर्व माहिती संदीपजीनी दिली ती अविस्मरणीय होती, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली. स्तब्ध आणि सावध, बऱ्याच गोष्टींचं ज्ञान असलेला परिपूर्ण व्यक्ती, सगळ्यांना सांभाळून घेणारे, समजून सांगणारे आमच्यासोबत संदीपजी नाहीत याच्यावर विश्वास अजून नाही, अशी भावनाही एका स्नेह्याने व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा