29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरविशेषऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार

ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार

टी २० सामन्यात भारताची आयर्लंडवर मात, मालिकेत विजयी आघाडी

Google News Follow

Related

ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव केला. रविवारी मलाहाइड, डब्लिन येथे हा सामना झाला. या दोघांमध्ये आणखी एक सामना रंगणार आहे. मात्र तत्पूर्वीच भारताने मालिका खिशात घातली आहे.

 

स्वत:च्या दुसऱ्या टी-२०मध्ये अर्धशतक ठोकणारा ऋतुराज आणि रिंकूच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने पाच विकेट्स गमावून १८५ धावांपर्यंत मजल मारली. सलामीच्या सामन्यात पावसाचा फटका बसल्यामुळे भारताने डीएलएस पद्धतीने दोन धावांनी विजय मिळवला होता. भारताच्या यशस्वी जैस्वालने आक्रमकता दाखवत ११ चेंडूंत १८ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

 

क्रेग यंगच्या चेंडूवर षटकार खेचण्याचा जयस्वालचा प्रयत्न कर्टिस कॅम्फरने झेल घेतल्यामुळे अयशस्वी ठरला. त्यामुळे भारताची सुरुवात काहीशी धीमीच झाली. भारताची दोन बाद ३५ अशी अवस्था झाली होती. तिलक वर्मा बॅरी मॅककार्थीच्या चेंडूला बळी पडला आणि जॉर्ज डॉकरेलने त्याला झेलबाद केले. फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकून राहण्याची आणि वेगाने धावा करण्याची गरज असताना, संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली भागिदारी केली. गायकवाड आणि सॅमसन यांनी तिसर्‍या विकेटसाठी ७१ धावांची निर्णायक भागीदारी रचून भारताला १२व्या षटकात १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. सॅमसनने २६ चेंडूंत ४० धावा केल्या. त्यामध्ये पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर, ऋतुराजने ५८ धावांचे योगदान दिले. लेग-स्पिनर व्हाईटला जबरदस्त पूल शॉट लगावत ऋतुराजने गायकवाडने अर्धशतक पूर्ण केले. परंतु मॅककर्थीच्या चेंडूला ऋतुराज गायकवाड बळी पडला. हॅरी टेक्टरने त्याचा झेल घेतला आणि भारताची ४ बाद १२९ अशी अवस्था झाली.

हे ही वाचा:

स्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद

पवारांना एकहाती सत्ता आणता आली नाही असं वळसे पाटील का म्हणाले?

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान !

संजय राऊत म्हणतात पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो, तर निवडणूकही लढू

शेवटच्या षटकांमध्ये अधिकाधिक धावा घेण्यासाठी रिंकू सिंग आणि शिवम दुबे सज्ज झाले. शेवटच्या षटकांत दोन उत्तुंग षटकार आणि एक चौकार ठोकत रिंकूने आयरिश गोलंदाजांची पिसे काढली. मार्क एडेअरच्या अंतिम षटकात २० धावा केल्या गेल्या आणि भारताने आयर्लंडसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. आयर्लंडची सुरुवातही निराशाजनक झाली. कर्णधार पॉल स्टर्लिंग धावा न करताच माघारी परतला. प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांच्या गोलंदाजीमुळे आयर्लंडची अवस्था चार बाद ६३ अशी झाली. अँडी बालबर्नीच्या ७२ धावांमुळे आयर्लंडच्या आशा जिवंत राहिल्या, परंतु अर्शदीप सिंगने त्याच्या ५०व्या टी-२० विकेटने अखेर त्यांच्या आशा-आकांक्षा धुळीस मिळवल्या आणि एक सामना बाकी असताना भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि भारतीय गोलंदाजांच्या जोरावर भारताने स्पर्धेतील वर्चस्व अधोरेखित केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा