25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरविशेषकटू आठवणी विसरून विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालाय सज्ज!

कटू आठवणी विसरून विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालाय सज्ज!

कसोटी मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा

Google News Follow

Related

सन २०२१-२२च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान विराट कोहलीवर मोठा दबाव होता. या दौऱ्यानंतर त्याने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. आता दोन वर्षांनंतर तो पुन्हा कोणत्याही दबावाविना त्याच्या लाडक्या मैदानांवर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे.सन २०१८मध्ये विराट कोहलीने जोहान्सबर्ग येथील सेंच्युरियन मैदानावर १५३ धावांची दमदार खेळी केली होती. तसेच, त्यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत तीन शतके ठोकून ५०० धावा केल्या होत्या. या जोरावर भारताने या देशात पहिलीवहिली ५० षटकांची मालिका जिंकली होती.

दक्षिण आफ्रिका हा विराट कोहलीचा लाडका देश ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यांत ५१.३५च्या सरासरीने ७१९ धावा तर, एकदिवसीय सामन्यांत ७४.८३च्या सरासरीने ८९८ धावा केल्या आहेत. मात्र सन २०२१-२२चा दौरा विराट कोहलीसाठी अपवाद ठरला. या दौऱ्याआधी त्याची एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हा त्याने पत्रकार परिषद घेऊन बीसीसीआयकडे संवादाचा अभाव असल्याची टीका केली होती.

तसेच, दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्याच्या केवळ ९० मिनिटे आधी बीसीसीएलचे तत्कालीन मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी आपल्याला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे कळवले होते, असे सांगितले होते. तसेच, तेव्हाचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपण विराट कोहलीशी वैयक्तिकरीत्या संवाद साधून त्याने टी२०चे कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती केली होती, असा दावा केला होता. विराटने गांगुलीचा हा दावाही खोडून काढला. त्यामुळे भारताच्या क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

हे ही वाचा:

सपा खासदार शफीकुर रेहमान याना बाबरी पुन्हा मिळवण्याची हौस!

राज ठाकरेंना निमंत्रण, उद्धव ठाकरे यादीत नाहीत!

सन २०२३मध्ये छोटे गुंतवणूकदार, छोट्या शेअर्सनी केली कमाल

नांदेडजवळ पूर्णा- परळी पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला आग

तेव्हा स्वतःच्या बॅटने उत्तर देण्यासाठी कोहलीवर प्रचंड दबाव होता. त्यात रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा जखमी असल्याने त्याच्यावरील जबाबदारीत वाढ झाली होती. तसेच, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही तो पहिलाच परदेश दौरा होता. कोहलीने तेव्हा सेन्च्युरियनवर भारताला विजय मिळवून दिला. मात्र दोन इनिंगमध्ये कोहलीला अवघ्या ५३ धावा करता आल्या. केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने मालिकेत १-०ने आघाडी मिळवली. मात्र कोहलीला दुखापत झाल्याने त्याला दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले आणि के. एल. राहुल याच्या नेतृत्वाखालील दुसरा सामना भारताला गमवावा लागला. कोहलीने तिसऱ्या सामन्यात वापसी केली. मात्र तरीही भारताचा सात विकेटने पराभव झाला.

कोहलीने कसोटी मालिकांमधील चार इनिंगमध्ये केवळ १६१ धावा केल्या. तर नंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेतही कोहली केवळ ११६ धावा करू शकला आणि के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही मालिका ३-०ने गमावली. या दौऱ्याच्या समाप्तीनंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा देऊन बॉम्ब टाकून क्रिकेटप्रेमींना धक्का दिला.

दोन वर्षांनंतर…

या सर्व घटनांना आता दोन वर्षे उलटली आहेत. विराट कोहली आता चांगल्या मानसिक स्थितीत आहे आणि सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्येही आहे. शिवाय कोहलीने कर्णधार ते आता संघातील ज्येष्ठ खेळाडू असा स्वतःमध्ये छान बदलही केला आहे. कोहलीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ९५च्या सरासरीने ११ सामन्यांत ७६५ धावा केल्या. त्यात तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. कोहलीने सन २०२३मध्ये सात कसोटी सामन्यांत ५५च्या सरासरीने ५५७ धावा केल्या असून त्यात दोन शतकांचा समावेश आहे. त्यामुळे आता तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष विराटच्या दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीकडे लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा