25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरविशेषसंभल हिंसाचार; शाळा-दुकाने उघडली, पण इंटरनेट सेवा बंद!

संभल हिंसाचार; शाळा-दुकाने उघडली, पण इंटरनेट सेवा बंद!

३० नोव्हेंबरपर्यंत बाहेरील लोकांना प्रवेश बंदी

Google News Follow

Related

युपीच्या संभलच्या वादग्रस्त जामा मशीद संकुलात सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी (२६ नोव्हेंबर) परिस्थिती सुधारल्याचे चित्र आहे, शाळाही सुरु झाल्या आहेत. सोमवारी बाजारातील दुकाने बंद होती मात्र आज अनेक भागात दुकाने उघडी दिसली.

संभलमध्ये परिस्थिती सामान्य झाल्याचे दिसत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तशीच माहिती दिली आहे. मात्र, मात्र जिल्ह्यात अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे. तसेच ३० नोव्हेंबरपर्यंत बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी ठेवण्यात आली आहे. संभल जिल्हा प्रशासनाने प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत.

रविवारी संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान मुस्लीम समाजाच्या लोकांनी सर्वेक्षणाला विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी परिसरातील गाड्या देखील जाळण्यात आल्या. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे २० लोक जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी २५ जणांना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिस सीसीटीव्हीची तपासणी करत करत आहेत.

पोलिस अधीक्षक (एसपी) कृष्ण कुमार विश्नोई यांनी पत्रकारांना सांगितले की, ज्यांनी नुकसान केले त्यांच्याकडून प्रत्येक पैसा वसूल केला जाईल. ते म्हणाले की, संभलमध्ये पोलिसांनी केवळ ‘प्लास्टिकच्या गोळ्या’ वापरल्या आणि पोलिसांच्या गोळ्यांमुळे कोणीही मरण पावले नाही. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही हे सिद्ध झाले आहे.

हे ही वाचा : 

एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ संपला, दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा!

चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके

चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके

विधानसभा निवडणुकीत ८५% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; १० वर्षांतील सर्वाधिक ३.५ कोटी रुपये जप्त

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा