28 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषकुत्ता गोळीची नशा कोण करतं ते ठाऊक आहे संजय राऊत!

कुत्ता गोळीची नशा कोण करतं ते ठाऊक आहे संजय राऊत!

भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर पलटवार

Google News Follow

Related

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर राज्यातील विरोधी पक्षांकडून सरकारवर आरोप केला जात आहे.या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा, गांजाची नशा करत नसतील पण वासानं त्यांनी गुंगी चढली असेल असे संजय राऊत म्हणाले होते.त्यानंतर आज नाशिक मध्ये ठाकरे गटाकडून काढण्यात आलेल्या मोर्चात, सरकारने कुत्ता गोळी खाल्लीय का? पालकमंत्री कुत्ता गोळी खावून बसलेत का? या कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा, असं राऊत म्हणाले.यावर भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या, दररोज सकाळी पिसाळल्यागत भुंकणा-यांना पाहिल्यानंतर जनतेला कळालंच असेल की कुत्ता गोळीची नशा कोण करतंय ते …सर्वज्ञानी संजय राऊत, असे ट्विट चित्रा वाघ यांच्याकडून करण्यात आले आहे.

ड्रग्स माफिया ललित पाटीलचा मुद्दा राज्यभर चांगलाच चर्चेत आहे.यावरून सत्तेधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत.ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई याना टार्गेट करण्यात आलं.यावर मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांनी सांगितले की, अंधारेंचे आरोप हे बिनबुडाचे आहेत.ड्रग्स प्रकरणी आम्ही चौकशीला तयार आहोत.आरोप सिद्ध झाल्यास आम्ही राजीनामा देऊ, असे
मंत्री शंभूराज देसाईकडून सांगण्यात आले होते.

त्यानंतर ड्रग्स रॅकेटच्या विरोधात आज ठाकरे गटाने प्रचंड मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात हजारो शिवसैनिक सामील झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. यावेळी संजय राऊत यांनी घणाघाती भाषण करत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.संजय राऊत म्हणाले, सरकारने कुत्ता गोळी खाल्लीय का? पालकमंत्री कुत्ता गोळी खावून बसलेत का? या कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा, असं राऊत म्हणाले. या मोर्चाचं हे विराट रूप पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी यायला हवं होतं. तिथे कंत्राटी भरतीवर पत्रकार परिषद घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा.. 

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

हमास, रशिया लोकशाहीच्या विरोधात

सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात वाढवण बंदरामुळे मोठे बदल होतील

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून संजय राऊत याना उत्तर देण्यात आले आहे.चित्र वाघ यांनी ट्विट केले.त्या म्हणाल्या, दररोज सकाळी पिसाळल्यागत भुंकणा-यांना पाहिल्यानंतर जनतेला कळालंच असेल की कुत्ता गोलीची नशा कोण करतंय ते …सर्वज्ञानी संजय राऊत @rautsanjay61 दररोज सकाळी तोंड उघडल्यानंतर जे काही बरळतात… त्यावरून कळतं की त्यांची कुत्ता गोळीची नशा कधी उतरतच नाही. कुत्ता गोलीच्या नशेत असल्यामुळेच सर्वज्ञानी संजय राऊतांच्या तोंडून महिलावाचक शिवीगाळ येते..बाळासाहेबांच्या विचारांना सोडून औरंगजेबाच्या थडग्यावर मस्तक टेकवणारे कुत्ता गोळीच्या नशेतच असावेत.

हिंदुत्वाचा विचार सोडून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांनी कुत्ता गोळी घेतली असावी.कोविड घोटाळ्यातील भ्रष्टाचार, पत्राचाळीतील भ्रष्टाचार हे गुन्हे कुत्ता गोळीची नशा करूनच केले असावेत… उद्धव ठाकरेंच्या आसपास असे कुत्ता गोळी खाणारे नशेबाज असल्यामुळेच त्यांचा पक्ष उद्ध्वस्त झाला.कुत्ता गोळीची ही नशा डोक्यात इतकी भिनलीय की, आता भ्रमिष्ट झालेल्या संजय राऊतांना महायुती सरकार करत असलेला महाराष्ट्राचा विकासही दिसेनासा झाला आहे… २०२४ च्या निवडणुकांनंतर यांची ही कुत्ता गोळीची भयानक नशा नक्की उतरेल…असे ट्विट चित्रा वाघ यांच्याकडून करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा