28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरविशेषटाळेबंदीमध्ये वाढले मुलींमध्ये बालविवाहाचे प्रमाण

टाळेबंदीमध्ये वाढले मुलींमध्ये बालविवाहाचे प्रमाण

Related

कोरोनामुक्त गावातील शाळा सुरू झाल्यानंतर एक धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. शैक्षणिक वर्षात प्रथमच विद्यार्थी- विद्यार्थिनी वर्गात परतल्याने शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काही शाळांना भेट दिली, तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. परंतु औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील चार-पाच गावांत दहावीच्या काही विद्यार्थिनी चक्क मंगळसूत्र घालून वर्गात आल्याचे दिसल्याने वर्गशिक्षक व अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

करोनामागे सर्व यंत्रणा लावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य समस्या तर वाढवल्याच, शिवाय सामाजिक व्यवस्थेलाही धक्का लावला. लॉकडाऊननंतरचे आर्थिक संकट व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे राज्यात बालविवाह वाढलेत. मुख्यमंत्री बसलेत करोनाची सनई फुंकत आणि चौघडे पिटत, असे म्हणत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर ट्विटरवरून टीका केली.

हे ही वाचा:
खासगी लसीकरण जोमात, पालिकेचे लसीकरण कोमात

पुणे-नाशिक प्रवास आता सुसाट

२०२२ पर्यंत देशाच्या सर्व सीमांवर कुंपण पूर्ण होणार

पालिका प्रशासनाचे दावे बुडाले पाण्यात

गेली दीड वर्षे शाळा बंद होत्या. गेल्या महिनाभरात एकही रुग्ण सापडला नाही अशा गावात शाळा सुरू करण्यास शासनाकडून परवानगी मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ५९५ गावांतील ४८८ शाळांची गुरुवारी अखेर घंटा वाजली. पहिल्या दिवशी आठवी ते बारावीच्या एकूण ६४ हजार २८२ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ५०९ विद्यार्थ्यांनीच म्हणजे फक्त २९ टक्के हजेरी लावली. परंतु मुलींच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून, ग्रामीण भागात बालमजुरी, बालविवाहांचे प्रमाण वाढत असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे.

गावातील पाहणीत दहावीतील तीन-चार विद्यार्थ्यांचे लॉकडाऊनमध्ये लग्न झाल्याचेही दिसून आले. त्यांची घरची परिस्थिती, सामाजिक-आर्थिक स्थितीचे परिणाम यामुळे त्या मुलींचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान हाेत असल्याचे दिसून आले. शेतकरी कुटुंबातील आर्थिक विवंचना तसेच दारिद्र्य  व इतर समस्यांमुळे बालविवाह उरकण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच शाळा बंद असल्यामुळे वयात आलेली मुलगी पाहून पालकांनी लग्नासाठी तगादा लावला. एकूणच हे चित्र पाहता, महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमधील परिस्थिती थोडी बहुत सारखीच आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा