29 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरराजकारणकुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी...

कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी…

Related

ठाकरे सरकार कुरार मेट्रो स्थानकासाठी मराठी माणसाच्या घरांवर बुलडोझर फिरवल्याची घटना शनिवारी सकाळी साऱ्या महाराष्ट्राने पहिली. या घटनेनंतर ठाकरे सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ‘मराठी माणसांची घरे तोडणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध’ अशा घोषणा देत नागरिकांनी उद्धव ठाकरे सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. तर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कुरार येथील मेट्रो स्थानकासाठी मराठी माणसाच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. या प्रसंगी आपली मुसळधार पावसात आपले घर वाचवण्यासाठी आक्रोश करणार्‍या आणि या कारवाईच्या आड येणाऱ्या नागरिकांना नागडे करून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली. तर या कारवाई विरोधात आवाज उठवणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार अतुल भातखळकर यांनाही पोलिसांनी अटक केली.

हे ही वाचा:

मुसळधार पावसात घरांवर बुलडोझर; नागरिक बेघर

२०२२ पर्यंत देशाच्या सर्व सीमांवर कुंपण पूर्ण होणार

मोदी-पवार भेट! कशासाठी झाली तासभर चर्चा?

ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी कोविडचा रुग्ण आढळला

पोलिसांच्या या सर्व कारवाई विरोधात भातखळकर हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात “आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा…केंद्राचे पैसे, देवेंद्र फडणवीसांची मेहनत, आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची”

पुढे जाऊन भातखळकरांनी ठाकरे सरकारची ही कारवाई म्हणजे मोगलाई असल्याचे म्हटले आहे. तर या कारवाईतून ठाकरे सरकारचा खरा अत्याचारी चेहरा दिसला असेही ते म्हणाले. “हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली.” असे भातखळकरांनी म्हटले आहे. तर या प्रकरणात सोमवारी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा