29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरविशेषमोटारीतून प्रवास करणाऱ्यासाठी सिलबेल्ट सक्ती

मोटारीतून प्रवास करणाऱ्यासाठी सिलबेल्ट सक्ती

Google News Follow

Related

कार चालकासह इतर प्रवाश्यांना सीटबेल्ट लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. मुंबईत १ नोव्हेंबर पासून हा नियम लागू करण्यात आलेला आहे. मुंबई वाहतूक विभागाने पत्रक काढून मुंबईत सीटबेल्ट सक्ती केली आहे.

१ नोव्हेंबर पासून सीटबेल्ट न लावणाऱ्यावर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे. राज्यात होणाऱ्या अपघातात सीटबेल्ट न लावल्यामुळे अनेकांना जीवास मुकावे लागले आहे. पालघर जिल्ह्यात नुकताच झालेल्या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला होता, सायरस मिस्त्री आणि त्याच्या शेजारी बसलेल्याने सीटबेल्ट लावले नसल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले असे तपासात समोर आले आहे.

या अपघातानंतर राज्यात सीटबेल्टचा मुद्दा समोर आला. वाहतूक विभागाने राज्यभरात सीटबेल्ट सक्तीचे केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने मुंबईत सीटबेल्ट सक्तीचे केले आहे. १ नोव्हेंबरपर्यत वाहन मालकांनी तसेच टॅक्सी चालकांनी  आपल्या वाहनाचे सीटबेल्ट तपासून घ्यावे. १ नोव्हेंबर नंतर मुंबईत वाहन चालक व सह प्रवाश्यांनी सीटबेल्टचा लावूनच प्रवास करावा अन्यथा मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर

राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले

आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

दिल्ली वाहतूक पोलिसांनी सीट बेल्टशी संबंधित नवीन नियमाचं पालन न करणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ बी म्हणजेच सीट बेल्ट न लावणे अंतर्गत ही कारवाई केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा