30 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरविशेषभाऊ तोरसेकर यांना डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान पुरस्कार

भाऊ तोरसेकर यांना डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान पुरस्कार

Related

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बुधवार, २३ जून रोजी मुंबई येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुंबईच्या दीपकमल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात आला असून अमरजीत मिश्र हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग मंत्री राहिलेले डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा २३ जून रोजी बलिदान दिवस साजरा केला जातो. काश्मीर हा भारतापासून तोडला जाऊ नये यासाठी डॉक्टर मुखर्जी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या याच बलिदानाचे स्मरण प्रतिवर्षी साऱ्या देशभरात केले जाते. मुंबईच्या दीपकमल फाउंडेशनतर्फे या बलिदान दिनाचे औचित्य साधून डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी अर्थात २०२१ मध्ये या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

कंगना रनौत स्वतःच दिग्दर्शित करणार ‘इमर्जन्सी’

‘तू ठान ले’ भारताच्या ऑलिम्पिक गीताचे दिमाखात लाँचींग

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा

मराठा, तरुण भारत, मार्मिक अशा विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमध्ये पत्रकारिता करणारे गणेश तोरसेकर उर्फ भाऊ हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि मार्मिक लेखन शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. गेले काही वर्ष ते मुक्त पत्रकारिता करत आहेत. जागता पहारा हा त्यांचा ब्लॉग आणि गेले काही महिने सुरू केलेला ‘प्रतीपक्ष’ हा त्यांचा यूट्यूब चैनल चांगलाच प्रसिद्ध आहे. तर ‘मोदीच का?’, ‘पुन्हा मोदीच का?’, ‘उरफाटा घटोत्कच’, ‘महाराष्ट्राचा महाजनादेश’ ही त्यांची पुस्तके चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत.

या पुरस्कार प्रदान सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मुंबई भाजपाचे अध्यक्ष, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा