28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरराजकारणदि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

Related

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा आता अधिकच तीव्र सुरू झालेला आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाकरता भूमिपूत्र विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आता अधिकच तीव्र झालेला आहे. याकरता आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते तसेच त्यांनी सिडकोच्या कार्यालयाला घेराव घातला.

आज सकाळपासून पालघर, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईमधून असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलन कृती समितीने ठाकरे सरकारला आता १५ ऑगस्टपर्यंतचा पर्याय दिलेला आहे. विमानतळाला दि.बां.चे नाव नक्की करण्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख देण्यात आलेली आहे. अन्यथा १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम चालू देणार नाही, असा इशारा कृती समितीने दिलेला आहे. त्यामुळे आता हा विमानतळ नामकरण वाद थेट सरकारला इशाराच आहे असे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

कंगना रनौत स्वतःच दिग्दर्शित करणार ‘इमर्जन्सी’

‘तू ठान ले’ भारताच्या ऑलिम्पिक गीताचे दिमाखात लाँचींग

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा

आंदोलनकर्ते हे भूमिपूत्र असून, दि. बा. पाटील यांच्या कार्याचा त्यांना अभिमान आहे. म्हणूनच ते दि. बा. पाटील या नावावर ठाम राहिलेले आहेत. नामकरण हा मुद्दा माजी खासदार संजीव नाईक तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढला जात आहे.

तांडेल मैदानात आज सर्व आंदोलनकर्ते एकत्र जमले. यावेळी महेश बालदी, भूषण पाटील, मंदा म्हात्रे, दशरथ भगत यांचे शिष्टमंडळ सिडको भवनमध्ये जाऊन त्यांनी सिडकोचे संचालक संजय मुखर्जी यांना निवेदन दिले. आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दि. बा. पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते एकत्र आले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील हे देखील कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी पोहचले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे असे सुचविले होते. त्यामुळे मनसे या आंदोलनात सहभागी होणार का नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. परंतु सिडकोने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेतला नाही, असे सांगत आमदार राजू पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. एकूणच नामकरणाच्या या मुद्द्याने आता चांगलाच पेट घेतलेला आहे. ठाकरे सरकार आता यावर काय तोडगा काढणार हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा