शिवसेना पक्षाचा आज ५९ व्या वर्धापन दिन असल्याने शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एनएससी डोम, वरळी येथे शिवसेना शिंदे गटाचा तर षण्मुखानंद हॉल येथे उबाठा गटाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, खरी शिवसेना आमचीच असा दावा दोनही गटाकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान, शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने शिवसेना शिंदे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर उबाठा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. शिंदे गटाने त्यांच्या पक्षाचा संस्थापक म्हणून अमित शाह यांचा फोटो लावला पाहिजे. आणि आनंद दिघे शिवसेना प्रमुख नव्हते तर ते ठाणे जिल्हाप्रमुख होते. दरम्यान, संजय राऊत यांच्या टीकेवर शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मागच्या दाराने आलेले, शून्य जनाधार असलेले आणि आपल्या वटवटीने संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करणारे संजय राऊत यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं, असे नरेश मस्के यांनी म्हटले आहे.
खासदार मस्के ट्वीटकरत म्हणाले, धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या उंचीवर आणि कामावर तुम्ही बोलू नये, त्यातच तुमचं भलं आहे. कारण, ती उंची त्यांनी पक्षासाठी स्वतःचं रक्त आटवून गाठलेली होती. तुमच्यासारखे छप्पन लोक त्यांच्या पुढे-मागे असताना, बाळासाहेबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असताना, कुठल्याही पदाची लालसा मनात न ठेवता, शिवसेना पक्ष केवळ ठाणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मजबूत करण्याचं काम दिघे साहेबांनी संपूर्ण हयातीत जीवनध्येयासारखं करत राहिले.
तुमच्यासारख्या बांडगुळांनी त्यांचा कायमच मत्सर केला, आणि आज तुम्ही आम्ही आमच्या बॅनरवर कोणाचा फोटो लावावा याबाबत फुकटचे सल्ले देत आहात… कोणत्याही ‘घराण्याचा’ वारसा नसताना, त्यांनी शिवसेना पक्षाला आपलं कुटुंब मानलं. प्रत्येक शिवसैनिकाच्या सुखदुःखात, आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहत, शिवसेनेसाठी अमूल्य असं योगदान दिलं. आम्ही खरे शिवसैनिक, प्रत्येक शिवसैनिकाचा मान राखतो, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो.
आम्हाला जितके बाळासाहेब वंदनीय आहेत, तितकेच दिघे साहेबही. ते तुम्हालासारख्या, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे उंबरे झिजवणाऱ्या आणि खासदारकीची माळ स्वतःच्या गळ्यात ओढून घेणाऱ्या, मागच्या दाराने आलेल्या बांडगुळांना कधीच कळणार नाही… तुमच्या रोजच्या वटवटीला महाराष्ट्र आधीच कंटाळलेला आहे. आता त्यातच, तुमची पोहोच नसलेल्या विषयात हात घालून स्वतःला खड्ड्यात घालू नका. आणि कृपया आमच्या लाडक्या, वंदनीय दिघे साहेबांबद्दल एक चकार शब्दही बोलू नका. हा माझा तुम्हाला इशारा आहे, असं समजा, असे नरेश मस्के म्हणाले.
हे ही वाचा :
मुंबई विमानतळावर २५ कोटींचा गांजासह गुजरातच्या दाम्पत्याला अटक
एअर इंडियाने अहमदाबाद विमान अपघाताच्या आठवणीत शेअर केली पोस्ट
छत्तीसगढमध्ये १६ वर्षांपासून राहणाऱ्या घुसखोर बांगलादेशी जोडप्याला अटक!
उत्तर २४ परगण्यात ईडीचा व्यावसायिकाच्या घरी छापा
दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणून काही लोक साजरा करत आहेत आणि त्यांच्या जाहिरातीवर बाळासाहेबांचे फोटो होते. बाळासाहेबांशी काय संबंध आहे यांचा?, त्यांनी पक्षाचे संस्थापक म्हणून अमित शाह यांचा फोटो टाकावा. त्यांनी त्यांचा वर्धापन दिन गुजरातमध्ये साजरा करायला हवा, महाराष्ट्राशी काय संबंध?. एसंशी गटाने आनंद दिघे यांचा फोटो टाकलेला आहे, दिघे पक्षप्रमुख नव्हते तर ते ठाणे जिल्हाप्रमुख होते.
मागच्या दाराने आलेले, शून्य जनाधार असलेले आणि आपल्या वटवटीने संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करणारे 'खाज'दार संजय राऊत यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं, असं आम्हाला वाटतं.
धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या उंचीवर आणि कामावर तुम्ही बोलू नये, त्यातच तुमचं भलं आहे. कारण, ती उंची… pic.twitter.com/pNc5RJrPQ9
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 19, 2025
