31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरविशेष“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”

“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘शिवनेरी’वर भाषण

Google News Follow

Related

तमाम जगताचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी ३९४ वी जयंती आहे. यानिमित्ताने राज्यासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या दिमाखात शिवजन्माचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते, तेवढेच व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखू दिली नाही. त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी त्यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याची आठवणही सांगितली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारत- पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यावेळची आठवण सांगताना एकनाथ शिंदे म्हटले की, “पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे काही करता येईल, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. २० फेब्रुवारी रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले असून ओबीसी आणि इतर समाजघटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले. अन्याय करणारा कितीही मोठा असो देव देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढायला शिकवले. आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करतोय. पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो. मात्र, यामधे बदल करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराजांच्या किल्ल्यांचे जतन केले जाणार असून शिवभक्तांमध्ये आनंद आहे.

हे ही वाचा:

माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन

भारताचा इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय

काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण

संदेशखाली हिंसाचार:टीएमसी नेते शिबू हाजरांना ८ दिवसांची पोलिस कोठडी!

शिवाजी महाराज म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन जाणारा विचार- अजित पवार

महायुती सरकार हे गड-किल्ल्यांसाठी काम करत आहे. गडांसाठी ८३ कोटी खर्च करण्यात आले आहेत. याबरोबरच इतर गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शिवाजी महाराज म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन जाणारा विचार. सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले, असं उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा