छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी मोठा रेल्वे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रवासी ट्रेन आणि मालगाडीच्या झालेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
लाल खदान परिसरात बिलासपूर- कटनी विभागात कोरबा पॅसेंजर ट्रेन एका उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की काही डबे एकमेकांवर आदळले, तर अनेक डबे रुळावरून घसरले. यामुळे प्रवाशांमध्ये आणि परिसरातील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या धडकेनंतर, अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. तसेच अपघातामुळे ओव्हरहेड वायर्स आणि सिग्नलिंग सिस्टीमचे गंभीर नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणून या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. रेल्वेची बचाव पथके, आरपीएफ कर्मचारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आपत्कालीन वैद्यकीय पथके जखमींवर उपचार करत आहेत, तर वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि कामाचे पर्यवेक्षण करत आहेत.
हेही वाचा..
बिगुल वाजले! २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर
म. फुले जनआरोग्य योजना ते चंद्रपुरात अभियांत्रिकी तंत्रनिकेतन! मंत्रिमंडळ बैठकीतले २१ निर्णय
युनूस सरकारने कट्टरपंथीयांसमोर टेकले गुडघे; शाळांमध्ये संगीत, नृत्य शिक्षकांची नियुक्ती रद्द!
मलेशियाच्या समुद्र किनाऱ्यावर राहुल गांधी तृप्त झाले नव्हते म्हणून …
माहिती मागणाऱ्या प्रवाशांसाठी आणि नातेवाईकांसाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. चंपा जंक्शन: ८०८५९५६५२, रायगड: ९७५२४८५६०, पेंड्रा रोड: ८२९४७३०१६२, अपघातस्थळी: ९७५२४८५४९९, ८६०२००७२०२ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या व्यत्ययामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.







