रविवारी तिबेटमधील माउंट एव्हरेस्ट प्रदेशात आलेल्या हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर, या हिमवादळाचा फटका गिर्यारोहकांनाही बसला. हिमालयात झालेल्या असामान्य मुसळधार बर्फवृष्टी आणि पावसामुळे सुमारे १,००० ट्रेकर्स अडकले. यातील अनेक ट्रेकर्सना बचाव पथकांनी सुरक्षित ठिकाणी नेले. रविवारपर्यंत, ३५० गिर्यारोहक कुदांग या छोट्या शहरात सुखरूप पोहोचले होते, तर उर्वरित २०० हून अधिक गिर्यारोहकांशी संपर्क साधण्यात यश आले होते. १,००० लोक अडकलेल्या या भागात साचलेला बर्फ काढून टाकण्यासाठी शेकडो स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके युद्ध पातळीवर काम करत होते.
कुदांगमध्ये पोहचलेल्या एका गिर्यारोहकाने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये असामान्य परिस्थिती निर्माण झाली आणि गुडघ्यापर्यंत बर्फ तसेच जोरदार वाऱ्यांमधून मार्गक्रमण करत असताना केवळ ढगाळ आकाश दिसत होते. खूप थंडी होती आणि हायपोथर्मियाचा धोका होता. त्याने पुढे म्हटले की या वर्षी हवामान सामान्य नसून त्याच्या मार्गदर्शकाने सांगितले की ऑक्टोबरमध्ये त्याने कधीही इतक्या तीव्र हवामानाचा सामना केला नव्हता. उर्वरित ट्रेकर्स स्थानिक सरकारने आयोजित केलेल्या बचाव पथकांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीने टप्प्याटप्प्याने कुदांगमध्ये पोहोचतील.
हे ही वाचा:
दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर कटकमध्ये कर्फ्यू
“गाझामधील शांतता योजनेला आणखी विलंब झाल्यास…” ट्रम्प यांनी काय इशारा दिला?
‘चार वेळा दहशतवाद्यांना भेटलो’
पूरस्थितीच्या नुकसानीचा अहवाल पाठवा, मोदी विनाविलंब मदत देणार!
८,८४९ मीटर उंचीच्या माउंट एव्हरेस्टच्या उत्तरेकडील बाजूस, ज्याला चीनमध्ये माउंट कोमोलांग्मा असेही म्हटले जाते. येथे काही उंचीपर्यंत पक्क्या रस्त्याने पोहचता येते त्यामुळे या भागात नियमितपणे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. ऑक्टोबर हा जगातील सर्वात उंच पर्वत शिखरावर चढाईचा हंगाम असतो, भारतात देखील परतीचा पाऊस सुरू असून तुलनेने आकाश स्वच्छ असते. मात्र, यंदा हवामान बदलले असून सततच्या हिमवृष्टीसोबतच शेजारील नेपाळ आणि भारताच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला.







