28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरविशेषस्पेनचा विजयी 'पंच', पोर्तुगाल-फ्रान्स सामना अनिर्णीत

स्पेनचा विजयी ‘पंच’, पोर्तुगाल-फ्रान्स सामना अनिर्णीत

Related

युरो कप फुटबॉल स्पर्धेचे बुधवारचे सामने हे अतिशय रोमहर्षक झाले. बुधवारी पार पडलेल्या चार सामन्यांपैकी पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्पेनने स्लोवाकियाचा तर स्विडनने पोलंडचा पराभव केला आहे. तर ग्रुप ऑफ डेथ अर्थात सर्वात कठीण ग्रुप समजल्या जाणाऱ्या ग्रुप एफ मधील सामने अनिर्णित राहिले.

बुधवारी रात्री ९.३० वाजता युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यांना सुरवात झाली. स्पेनचे आव्हान पेलण्यासाठी स्लोव्हाकिया मैदानात उतरला होता तर पोलंडसमोर स्विडनचे आव्हान होते. पण स्पेनने स्लोवाकियाची पार धूळधाण उडवली. ५-० असा विजय संपादन करत त्यांनी आपले पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले. तर दुसऱ्या सामन्यात पोलंडला हरवण्यात स्विडनला यश आले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात स्विडनने ३ गोल नोंदवले तर पोलंडला मात्र दोनच गोल करता आले.

हे ही वाचा:

बापरे! मोबाईल चोरामुळे इसम गंभीर जखमी

विधिच्या विद्यार्थ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ

महापालिकेने घेतला घोटाळ्याचा ‘आश्रय’

ऑनलाईन अध्यापनासाठी गुगलच गुरु

पण बुधवारच्या ज्या मुख्य सामन्याकडे साऱ्या जगातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष्य लागून राहिले होते तो सामना म्हणजे पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स! अपेक्षेप्रमाणेच हा सामना अतिशय अटीतटीचा झाला. दोन्ही संघांकडून गोल करण्याचा आणि गोल वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. पण हा सामना अखेर २ – २ अशा बरोबरीत सुटला. विशेष म्हणजे या चार गोलपैकी पोर्तुगाल संघाचे दोन्ही गोल तर फ्रान्सचा एक गोल हे पेनल्टी मधून आले. पोर्तुगालकडून कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने दोन्ही गोल केले तर करीम बेंझिमा हा फ्रान्सकडून गोल नोंदवणारा एकमेव खेळाडू ठरला.

तर ग्रुप एफ मधील दुसऱ्या सामन्यात धक्कादायकरित्या हंगेरीने जर्मनीसोबत बरोबरी साधली आहे. सुरवातीपासूनचा हंगेरीने या सामन्यावर आपली पकड बनवली होती. त्यांनी दोन वेळा सामन्यात आघाडीही घेतली होती. पण अखेरच्या काही क्षणात बरोबरी साधण्यात जर्मनीला यश आले. या सामन्यांसोबतच युरो कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजचे सामने पूर्ण झाले असून आता स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ ला सुरुवात झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा