28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषभारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन

भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन

सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता

Google News Follow

Related

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी लागेल तितके पैसे मोजून सामना पाहण्यासाठी गर्दी करतात. क्रिकेट चाहत्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून एक चांगली बातमी आहे. भारत- पाकिस्तान सामना बघण्यासाठी अहमदाबादला जाण्यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष ट्रेन (Spacial Trains) चालवण्याची घोषणा केली आहे.

मात्र, काल पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकिटं अवघ्या १७ मिनिटांत फुल्ल झाली. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा तुफान प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं दुसऱ्या स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. ही ट्रेन आज रात्री ११.२० वाजता मुंबई सेंट्रल इथून सुटणार असून उद्या सकाळी ७.२० वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या विशेष ट्रेनची आसन क्षमता १ हजार ५३१ इतकी आहे.

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना विशेष सुविधा देण्यासाठी पश्चिम रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादमध्ये १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी विशेष ट्रेनमुळे टीम इंडिया- पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या अतिरिक्त गर्दीला सामावून घेता येईल. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही विशेष गाडी मुंबई सेंट्रल येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी परतेल. यासाठी रेल्वेनं तिकीट दरही निश्चित केले आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०९०१३/०९०१४ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल दरम्यान धावेल.

ट्रेन क्रमांक ०९०१३ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल शुक्रवार, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल येथून २१.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्पेशल अहमदाबादहून रविवार, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी ४ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन येथे थांबेल.

हे ही वाचा:

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

२०२४ साठी काँग्रेसचे फोडा आणि सत्ता ओढा धोरण…

शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत

जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. या सामन्याच्या सुरक्षेसाठी अहमदाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून या सामन्याला एक लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा