30.2 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरविशेषसुखोई, राफेलसह ५० विमानांचा अवकाशात थरार

सुखोई, राफेलसह ५० विमानांचा अवकाशात थरार

हवाई सामर्थ्याने केले सर्वांना मंत्रमुग्ध

Google News Follow

Related

प्रजासत्ताकी दिनी देशाच्या वायू दलाच्या सामर्थ्याचा याचे देही याचा डोळा दर्शन घेणे एक वेगळीच अनुभूती असते. प्रजासत्ताक दिनी सुखोई आणि राफेलसह ५० विमानांनी केलेल्या रोमांचक कसरतीमुळे कर्तव्य पथावरील सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गेले. भारतीय हवाई दलाच्या ५० विमाने आणि हेलिकॉप्टरद्वारे एक आकर्षक एअर शो सादर करण्यात आला. फ्लाय पास्ट दरम्यान हवाई दलाच्या ४५, नौदलाच्या एक आणि लष्कराच्या चार हेलिकॉप्टर्सनी आपले कौशल्य दाखवत सादरीकरण केले.

राफेल, सुखोई, मिग यांसारख्या विमानांनी कर्तव्य मार्गावर बाज, प्रचंड, तिरंगा, गरुड आणि त्रिशूल या हेलिकॉप्टरच्या मदतीने आकाशात विविध प्रकारची रचना करून लोकांना मंत्रमुग्ध केले. वायू दलाच्या विमानांच्या आवाजाने संपूर्ण कर्तव्य पाठ दणाणून सोडला होता. आकाशातल्या या कसरतीमध्ये दोन आपचे हेलिकॉप्टर च्या मनमोहक कसरती उपस्थिताटांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या. फ्लायप्लास्टमध्ये प्रचंड , सारंग हेलिकॉप्टरने तिरंगा साकारला. राफेल, मिग-२९, एसयू-३०, सुखोई-३० एमकेआय, जग्वार, सी-१३०, सी-१७, डॉर्नियर, डकोटा या सारख्या भारतीय हवाई दलातील जुन्या बरोबरच आधुनिक विमाने आणि हेलिकॉप्टरने फ्लाय पास्ट भाग घेतला.

हे ही वाचा:

भारतीय संस्कृती, एकता, संरक्षण दल सज्जतेच्या दर्शनाने कर्तव्यपथ सजला

श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी

बंधुभाव आणला तर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने होईल साकार

भारताची लष्करी क्षमता पाहिली
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोटरसायकलीचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण होते. अर्जुन रणगाडा , नाग, ब्राम्होस क्षेपणास्त्र यांनी लक्ष वेधत लष्कराचे सामर्थ्य दाखवून दिले. विशेष म्हणजे या वर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात अग्निवीरही सहभागी झाले होते

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा