30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरविशेषवरळी आदर्श नगर मैदानातील कुंपण क्रीडाप्रेमींनी उखडून टाकले!

वरळी आदर्श नगर मैदानातील कुंपण क्रीडाप्रेमींनी उखडून टाकले!

जागेचा वाद कित्येक वर्षांपासून सुरू

Google News Follow

Related

वरळी येथील आदर्श नगर मैदानात असलेल्या जनता हायस्कूल जवळील काही भाग मंगळवारी लोखंडी कुंपण घालून बंद करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. अखेर हे खांब स्थानिकांनी उखडून टाकले. हा कुंपण घातलेला भाग नेमका कुणाचा, तो हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असे प्रश्न उपस्थित केले गेले. या जागेला कुंपण घातल्यानंतर क्रिकेटप्रेमी आणि स्थानिकांनी जोरदार विरोध केला. स्थानिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते.

मैदानाचा हा भाग हडप करण्यात येत असल्याच्या संशयामुळे ‘पुढच्या पिढीसाठी जे एकमेव मैदान राहिले आहे. ते सुद्धा खेळायला मिळणार नाही. सर्वांनी एकत्र या आणि आपले मैदान वाचवा,’ अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर फिरायला लागले. त्यानंतर तातडीने क्रिक्रेट खेळणारी मुले आणि स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर वरळी आदर्श नगर येथील क्रीडाप्रेमी आणि क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी ते खांब उखडून टाकले.

या जागेचा वाद कित्येक वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला म्हाडाकडून ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर ही जागा आहे. खादी ग्रामोद्योगचा फलक या जागेवर लावलेला आहे. खादी ग्रामोद्योगचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले की, ही जागा आम्हाला म्हाडाकडून भाडेतत्त्वावर मिळाली आहे. पण गेली अनेक वर्षे तिथे काहीही काम झालेले नाही. मात्र ती आम्हाला म्हाडाने दिलेली आहे. त्यामुळे तिथे हे खांब लावण्यात आले होते.

यावर मनसेचे मुंबई शहर सचिव, रोशन पावसकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले. मुंबईतील आदर्श नगर वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानातील अतिक्रमण हा माझ्यासाठी एक स्थानिक रहिवाशी म्हणून चिंतेचा मुद्दा आहे. गेली ५० वर्षांहून अधिक काळ आम्ही इथे राहतो आणि आमची तिसरी पिढी ह्या मैदानात खेळत आहे, विशेषत: मुंबईतील मैदानांची कमतरता लक्षात घेता. अशा मोकळ्या जागांचे जतन करण्याची गरज समुदायाची आहे. आदर्श नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांसाठी अशा मौल्यवान जागा क्रीडा आणि मनोरंजनासाठी उपलब्ध राहतील, याची खात्री करण्यासाठी तिथे काही  अतिक्रमण असेल तर ते दूर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

काँग्रेसकडून सोनिया गांधींची राज्यसभा निवडणुकीत उडी; राज्यातून चंद्रकांत हांडोरे यांना संधी

उत्तरप्रदेश: मराठा कालीन बांधलेल्या विहिरीच्या उत्खननात सापडला ३०० वर्ष जुना शंख आणि शिल्पे!

१९६१ नंतर मणिपूरमध्ये स्थायिक झालेल्यांना ‘हद्दपार’ करणार!

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम

मुंबई विकासाच्या नावाखाली गुदमरत आहे, मैदाने कमी होत आहेत. चला एकत्रितपणे आवाज उठवूया! वरळी मैदानाचे संरक्षण करावे. आपल्या मैदानांसाठी आपल्या शहरात श्वास घेण्याच्या आणि खेळण्याच्या अधिकारासाठी प्रभादेवी, वरळी, दादरकरांनी एकत्रित पणे उभे राहा, अशी मागणीही यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.

वरळी स्पोर्ट्सने घेतली मिटींग
या मिटींगमध्ये क्रिकेट खेळणारी मुले, क्रीडाप्रेमी, राजकारणी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपआपली मते मांडली. या बैठकीत मैदान बचाव कृती समिती तयार करण्याविषयीही चर्चा झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा