30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरविशेष...तर उत्तेजके घेणारे खेळाडूही ठरू शकतील राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र!

…तर उत्तेजके घेणारे खेळाडूही ठरू शकतील राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र!

Related

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची येत्या काही दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. क्रीडा पुरस्कारासाठी एक नवा आदेश क्रीडा मंत्रालयाने काढला आहे. ‘उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेले; पण बंदीचा कालावधी पूर्ण केलेले खेळाडू आणि प्रशिक्षक राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र ठरतील,’ असा आदेश क्रीडा मंत्रालयाने काढला आहे. बुधवारी क्रीडा मंत्रालयाने या आदेशाचे परिपत्रक काढले आहे.

‘डोपिंगच्या नियमाचे उल्लंघन केलेल्या अ‍ॅथलीटने बंदीचा कालावधी पूर्ण केला असेल, तर त्याचा विचार राष्ट्रीय पुरस्कारांसाठी होईल. बंदीच्या/ निलंबनाच्या/ शिक्षेच्या कालावधीतील खेळाडूची कोणतीही कामगिरी पुरस्कारासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. मात्र ज्या अ‍ॅथलीटची चौकशी सुरू आहे किंवा प्रलंबित आहे, त्या खेळाडूचा पुरस्कारांसासाठी विचार केला जाणार नाही, असे आदेशाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

या नव्या आदेशामुळे अमित पंघललासारख्या खेळाडूंना फायदा होणार आहे. गेल्यावर्षीपर्यंत उत्तेजकांमध्ये दोषी आढळेलेल्या खेळाडूंचा राष्ट्रीय पुरस्कारांसाठी विचार केला जात नव्हता. या नियमामुळे पंघालला २०१२ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार नाकारण्यात आला होता. त्याची दोन वेळा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र, उत्तेजकांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तो दुर्लक्षित राहत होता.

हे ही वाचा:

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

अरबी समुद्रात नौकानयनपटूंनी भरली शिडात हवा

…म्हणून नवऱ्याने दोन महिन्यांच्या मुलीला टाकून दिले!

बोरिवली पश्चिमेचा स्कायवॉक बनला भिकारी, गर्दुल्ल्यांचा अड्डा!

क्रीडा मंत्रालयाने प्रशिक्षकांनाही यातून सूट दिली आहे. ‘जागतिक उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थेने (वाडा) बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास अ‍ॅथलीटला प्रोत्साहन देताना प्रशिक्षक आढळले असतील आणि त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थेने (नाडा) बंदी आणली असेल; पण त्यांचा बंदीचा कालावधी पूर्ण झाला असेल, प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पात्र ठरतील,’ असे क्रीडा मंत्रालयाने सांगितले.

बंदीचा कालावधी संपल्यावर खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली जाते. मग त्यांचा पुरस्कार कसा रोखला जाऊ शकतो, बंदीचा कालावधी पूर्ण केलेल्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकल्यास त्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार नाही का, असा सवाल अनेकदा उत्तेजक द्रव सेवन विरोधी आणि स्पोर्ट्स मेडिसन तज्ज्ञ डॉ. पीएसएम चंद्रन यांनी केला होता, या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा