28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरविशेषतीन दिवसात ४७ लाख लसी राज्यांना मिळणार

तीन दिवसात ४७ लाख लसी राज्यांना मिळणार

Related

देशातल्या लसींबाबत आज केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजून सुमारे १.०५ कोटी लसी वापरासाठी तयार आहेत. त्याशिवाय केंद्राकडून त्यांना ४७ लाख डोसेस येत्या तीन दिवसांत मिळणार आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

या बाबत केंद्राने एक पत्रक जाहिर केले आहे. केंद्राकडून मोफत आणि राज्यांसाठी केलेली थेट खरेदी अशा दोन्ही पद्धतीतून २६.६९ कोटी लसींचा पुरवठा राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केला आहे. या पत्रकानुसार वाया गेलेल्या लसी आणि दिले गेलेल डोसेस मिळून एकूण २५,६७,२१,०६९ लसींचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार १.०५ (१,०५,६१,८६१) कोटी लसींचा राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांकडून वापर होणे बाकी आहे.

हे ही वाचा:

अँटालिया प्रकरणी एनआयएकडून दोघांना अटक

हिंदुत्वाचे मारेकरी!

नागपुरमध्ये आशा वर्कर्सचे आंदोलन सुरु

अयोध्येतील राम मंदिरासाठी राजस्थानातील गुलाबी दगडाच्या खाणकामाला सुरूवात

याशिवाय केंद्राकडून राज्यांना याव्यतिरिक्त ४७ लाख (४७,४३,५८०) लसींचा पुरवठा येत्या तीन दिवसांत होणार असून, त्यासाठीचे व्यवस्थापन केले जात आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविडविरुद्धच्या लढ्याच्या तिसऱ्या टप्प्याला १ मे पासून सुरूवात झाली असून या कालावधीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त लस उत्पादकांच्या ५० टक्के लस मात्रा केंद्र सरकार खरेदी करते आणि त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना या लसी मोफत देण्यात येतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा