30.5 C
Mumbai
Wednesday, June 17, 2026
घरविशेषविवान कारुळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक भवनाची भेट

विवान कारुळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक भवनाची भेट

शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी ₹१.५ कोटींचे योगदान

Google News Follow

Related

शिक्षण क्षेत्राला बळ देण्याच्या उद्देशाने युवा उद्योजक विवान प्रशांत कारुळकर यांनी उंबरगाव एज्युकेशन सोसायटी संचालित एम. एम. हायस्कूलच्या शैक्षणिक विकासासाठी तब्बल ₹१.५ कोटींचे योगदान देत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या या योगदानातून उभारण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक भवनाचे उद्घाटन १० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

नर्सरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक शैक्षणिक इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी विवान कारुळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासमवेत कारुळकर कुटुंबीय, शाळेचे मुख्याध्यापक, उंबरगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव, संस्थेचे पदाधिकारी तसेच उमरगाम नगरपालिकेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना विवान कारुळकर यांनी आपल्या आजींच्या स्मृतींना अभिवादन करत शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना आधुनिक वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळावी, या हेतूने हे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

कारुळकर परिवाराच्या या उदार मदतीबद्दल संस्थेच्या सचिवांनी त्यांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, या आर्थिक योगदानामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक दर्जेदार आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून शिक्षणाचा दर्जाही उंचावण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा:

घोडबंदरला वीर चिमाजी आप्पा यांचे नाव द्या!

जसपाल राणाच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण त्यागले

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सिराज यांनी केले खेळाडूंना मार्गदर्शन

ऑनलाईन ड्रायव्हरनेच ‘डल्ला’ मारला

नवीन शैक्षणिक भवनामध्ये प्रशस्त आणि हवेशीर वर्गखोल्या, आधुनिक शैक्षणिक सुविधा, सुरक्षित वातावरण तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विविध सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. युवा उद्योजक, लेखक आणि धोरणतज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या विवान प्रशांत कारुळकर यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या या मोलाच्या योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा