23 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरविशेषसुनील गावस्कर यांच्या मातोश्रींचे निधन

सुनील गावस्कर यांच्या मातोश्रींचे निधन

मीनल गावस्कर यांनी ९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सुनील गावस्कर यांच्या घरून वाईट बातमी आली आहे. सुनील गावस्कर यांच्या मातोश्री मीनल गावस्कर यांचे त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ९५ वर्षांचे होते.

वयोमानापरत्वे त्यांना विविध आजार झाले होते. रविवारी सकाळी मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
सुनील गावस्कर हे आयपीएलच्या भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी म्हणून समालोचक म्हणून काम बघत होते. गावस्कर यांच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून बिघडली होती. याच कारणामुळे ते आयपीएलच्या गेल्या मोसमात बाद फेरीत समालोचनासाठीही उपस्थित नव्हते. त्यानंतर गावस्कर आपल्या आईची काळजी घेण्यासाठी आयपीएल दौरा सोडून मध्यंतरी घरी परतले होते.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे समालोचन सुरू असतानाच त्यांना ही वाईट बातमी कळली.
चौथ्या दिवशीही गावसकर यांनी आपली समालोचन सुरू ठेवत त्यांनी आपले कर्तव्य बजावले. आईच्या निधनाची बातमी कळूनही त्यांनी आपले दुःख दाखवले नाही. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने सामना जिंकला होता.

गावस्कर यांच्या मातोश्री गेल्या एक वर्षापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएलदरम्यान त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयपीएलसाठी कॉमेंट्री करणाऱ्या गावसकरला आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी बायो-बबलमधून बाहेर पडावे लागले.

हे ही वाचा:

कर्नाटकातील कला संस्कृतीच्या जपणुकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक

संजय राऊत यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय?

सावरकरांच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाची अंमलबजावणी केली असती तर…

लोकांचा सहभाग हीच ‘नमामि गंगे’ मोहिमेची ऊर्जा

७३ वर्षीय गावस्कर हे भारताच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. त्यांची कारकीर्द १९७१ ते १९८७ अशी होती. यादरम्यान त्यांनी १२५ कसोटींमध्ये ३४ शतकांसह १०,१२५ धावा त्यांनी केल्या. त्यांनी भारतासाठी १०८ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ३,०९२ धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा पार करणारा गावसकर जगातील पहिला फलंदाज होता. त्याने ४७ कसोटी सामने आणि ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर, तो समालोचक बनला. बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी सामना चार दिवसात संपल्यानंतर गावस्कर आपल्या आईच्या अंतिम संस्कारासाठी लवकरच भारतात परतण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा