27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरविशेषरोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!

रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!

भारताची सुरुवात चांगली

Google News Follow

Related

कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे भारताने आयर्लंडवर आठ विकेट आणि ४६ चेंडू राखून विजय मिळवला. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी आयर्लंडच्या संघाला अवघ्या ९६ धावांतच गुंडाळले होते. रोहित ५२ धावांवर असताना जखमी झाला, त्यामुळे तो पुढे खेळ सुरू ठेवला नाही.

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानावर उतरले. मात्र आयर्लंडच्या उंचपुऱ्या गोलंदाजांना विराट कोहलीला बाद करण्यात यश आले. तेव्हा भारताची अवस्था एक बाद २२ अशी झाली होती. पण जम बसल्यावर रोहित शर्माने चांगली फटकेबाजी केली. कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंत जोडीला आला. रोहित आणि पंतने ५४ धावांची भागीदारी केली.

हे ही वाचा:

‘हिंदुत्ववादी मतदारांवर लक्ष केंद्रित करा, डाव्या विचारसरणीला धक्का देणाऱ्या नव-हिंदुत्ववादींपासून अंतर ठेवा’

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार

युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने रचला इतिहास

नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांचा आयटीबीपी पोलिस कॅम्पवर हल्ला, जीवितहानी नाही!

रोहितने टी२०मधील आपले ३८वे शतक ठोकले आणि टी २०मधील चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. टी २० सामन्यांत त्याने आतापर्यंत ६०० षटकार खेचले आहेत. रोहितने ३२ चेंडूंत ५२ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर रोहितचा उजवा खांदा दुखावल्याने त्याने सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारताला विजयासाठी २१ धावा होत्या. त्यानंतर ऋषभ पंतचा डावा गुडखा दुखावला. तरीही पंतने फलंदाजी केली. त्याने २६ चेंडूंत ३६ धावा केल्या सूर्युकमार यादवने चार चेंडूंत दोन धावा केल्या आणि तो बाद झाला. अखेर भारताने १२.२ षटकांत दोन विकेटच्या मोबदल्यात हा सामना खिशात टाकला.

तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताच्या गोलंदाजांनी आयर्लंडच्या फलंदाजांची पिसे काढून त्यांना अवघ्या ९६ धावांत गुंडाळले. अर्शदीप सिंगने चार षटकांत ३५ धावा देऊन दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने तीन षटकांत १३ धावा देऊन एक विकेट पटकावली. जसप्रीत बुमराह याने तीन षटकांत सहा धावा देऊन दोन तर, हार्दिक पांड्याने चार षटकांत २७ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. आयर्लंडकडून केवळ गेरेथ डिलेनी याने चांगली फलंदाजी केली. त्याने १४ चेंडूंत २६ धावा केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा