28.7 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरविशेषतामिळनाडूत हिंदीतील साईनबोर्डवरून वाद

तामिळनाडूत हिंदीतील साईनबोर्डवरून वाद

गदारोळानंतर २ अभियंत्यांवर कारवाई

Google News Follow

Related

तामिळनाडूच्या तूतुकुडी जिल्ह्यातील सत्तानकुलम येथे राज्य महामार्ग विभागाने लावलेल्या एका साईनबोर्डवर हिंदी भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे. सत्तानकुलम-नाझरेथ राज्य महामार्गावर करुमेनी नदीच्या पुलाजवळ हा साईनबोर्ड लावण्यात आला होता. या साईनबोर्डवर तूतुकुडी, तिरुचेंदूर, आळवारतिरुनगरी आणि तिरुनेलवेली या ठिकाणांची नावे तमिळ, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिण्यात आली होती. तामिळनाडूमध्ये सरकारी साईनबोर्डवर प्रामुख्याने तमिळ आणि इंग्रजीचा वापर केला जात असताना या साईनबोर्डवर हिंदीचा समावेश करण्यात आल्याने त्यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. साईनबोर्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.

तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेच्या वापराचा मुद्दा संवेदनशील मानला जातो. त्यामुळे सरकारी महामार्गावरील साईनबोर्डवर हिंदीचा समावेश का करण्यात आला, असा सवाल उपस्थित करण्यात आला. राज्याच्या भाषाविषयक धोरणाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत विविध राजकीय नेत्यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. वाद वाढल्यानंतर राज्य महामार्ग विभागाने तातडीने संबंधित साईनबोर्डवरील हिंदी मजकूर हटवला.
हे ही वाचा:
मतदार यादीत नाव आहे म्हणून आंदोलन!

४ ऑक्टोबरला मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

एमपीएससी सचिव महेंद्र हरपळकरांची बदली

ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये परतण्याचे अधीर रंजन चौधरींचे निमंत्रण

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महामार्ग विभागातील दोन अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांना निलंबित करण्यात आले असून, साईनबोर्डवर हिंदीचा समावेश करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, याची विभागीय चौकशी केली जात आहे. एका साईनबोर्डवरील हिंदीच्या वापरामुळे सुरू झालेल्या या वादानंतर तामिळनाडूमधील भाषा धोरण आणि सरकारी साईनबोर्डवरील भाषेचा वापर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा