31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषकिशोरवयीन शंभूप्रेमींची महाराजांना अनोखी आदरांजली! अनवाणी पायाने सर केले ५ गड

किशोरवयीन शंभूप्रेमींची महाराजांना अनोखी आदरांजली! अनवाणी पायाने सर केले ५ गड

Google News Follow

Related

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम पार पडले, पण अशावेळी मोरेवस्तीतील किशोरवयीन मुलांनी एका अनोख्या पद्धतीने आपल्या आदर्श राज्यांना अभिवादन केले आहे. अनवाणी दुर्गवारी करत त्यांनी जनतेला हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की पहीले इतिहास समजा व त्यासहीत इतिहास जगा ;त्यामुळे या मुलांनी १ दिवसात ५ गडकिल्ले सर केले.

पांडाभाऊ साने युवा मंच नारी शक्ती महिला मंच सहकार्य यांच्या मार्गदर्शनाखाली मोरेवस्ती येथील मुला-मुलींनी कराटे प्रशिक्षण देणाऱ्या U.S.K.A पिंपरी चिंचवड शहरातील कराटे या ग्रुपने पाच गड किल्ले सर केलेत. दिनांक १४ मे छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त ९ ते १७ वयोगटातील मुलामुलींनी हे ५ गडकिल्ले सर केलेत. यामध्ये कोरिगड, तिकोना, विसापूर, लोहगड, राजगड या गड किल्ल्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा

पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक

हट्टाने उत्तर प्रदेशला गेलो असतो तर मनसैनिक सापळ्यात अडकले असते!

ठाकरे सरकार आले ताळ्यावर; पेट्रोल २.६ रुपयांनी तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त

या पाच गडकिल्ल्यांची दुर्गवारी अनवाणी पायांनी पूर्ण केलेल्या मुलांची नावे दिप्ती संतोषी हलकुडे, पृथ्वीराज सुनिता फडाले‌, गणेश मनिषा पाटील, नेत्रा शैला थिटे, भक्ती नर्मदा घुले, श्रावणी संतोषी हलकुडे, सानिका सुरेखा यादव, कल्पेश मंगला वाडोकार, गुणवंत मंदा भंगाळे अशी आहेत.

तर या मोहिमेचे प्रशिक्षक म्हणून प्रफुल्ल शोभा ‌श्रेष्टा आणि मार्गदर्शक म्हणून सौ.आरती मल्ला यांनी काम पाहिले. महिन्यातून एकदा तरी मुलांसहीत गडकिल्ले सर करावेत व गडकिल्लांवर कचरा पसरवू नये याची दक्षता घ्यावी असा हा या मुलांचा अजून एक असा प्रेरणादायी संदेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा