30 C
Mumbai
Wednesday, June 22, 2022
घरविशेषजाणिवांचे प्रतिबिंब कवितांमध्ये : वैभव जोशी

जाणिवांचे प्रतिबिंब कवितांमध्ये : वैभव जोशी

Related

उदयोन्मुख कवयित्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहाचे प्रकाशन

काही कविता या पटवून देण्यासाठी असतात तर काही कविता या विचार करायला लावणार्‍या असतात. विशाखा विश्वनाथ हिच्या कविता या विचार करायला लावणार्‍या आहेत. तिच्या जाणिवांचे प्रतिबिंब तिच्या कवितांमधून दिसते, असे गौरवोद्गार कवी-गीतकार वैभव जोशी यांनी काढले. आजच्या काळातील आश्वासक कवयित्री म्हणून विशाखा यांच्याकडे नक्कीच पाहिले जाईल असेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

ज्योत्स्ना भोळे सभागृहात गमभन प्रकाशनातर्फे विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन कवी जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक ल. म. कडू, विशाखा यांचे वडिल विश्वनाथ गढरी, आई भारती गढरी आणि बहिण अनुष्का गढरी व्यासपीठावर होते.

जोशी पुढे म्हणाले, विशाखाच्या कवितांमध्ये समाजाचे प्रतिबिंब दिसते. एकाच वेळी आत्ममग्न वाटणार्‍या कवितेतून समाजाचा आत्माही सापडावा असा संयोग फार कमी कविता संग्रहांमधून जाणवतो. आजच्या पिढीला संग्राह्य असा हा कविता संग्रह आहे. कोणाही लेखकाची, कवीची पहिली कलाकृती ही त्याचे आत्मचरित्रच असते. आयुष्यातील अनुभवांना कवेत घेतानाच आपण ज्या काळात जगतो आहोत त्यातील अनेक प्रसंग टीपकागदाप्रमाणे शोषून घेऊन त्याचे पडसाद कवितांमध्ये उमटणे हे दैवी प्रतिभेचे लक्षण आहे. कमी वयात विविध विषयांवरील कविता विशाखा यांनी मोठ्या ताकदीने लिहिल्या आहेत याचे आश्चर्य आहे. मुक्तछंदातील या कवितांमध्ये अनेक सौंदर्य स्थळे आहेत, भाषा सुंदर आहे. कवीच्या मनातील घुसमट ही आक्रोशाकडे जात नाही त्यामुळे या कविता वाचकांना नक्कीच गुंतवून ठेवतील.

हे ही वाचा:

फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा

पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक

हट्टाने उत्तर प्रदेशला गेलो असतो तर मनसैनिक सापळ्यात अडकले असते!

राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती

विशाखा विश्वनाथ म्हणाल्या, कल्पना सत्यात उतरते यावर माझा विश्वास आहे. काहीतरी लिहिता येते, बांधता येते हे समजण्यासाठी तुम्हाला शिक्षकांची, मार्गदर्शकाची आवश्यकता असते. असे अनेक मार्गदर्शक मला वेळोवेळी भेटत राहिले त्यामुळे मी माझ्या कम्फर्ट झोनमधून स्वत:ला बाहेर काढले आणि स्वत:ला स्वत: विरूद्ध उभी करू शकले. मला कल्पनेतील मैत्री फार लवकर गवसली त्यातून माझ्या मनात अनेक कल्पना रूजत गेल्या. माझ्या आजोबांनी प्रतिभा म्हणजे काय हे मला समजावून सांगितले. त्यातून मी घडत गेले म्हणून हे पुस्तक मी माझ्या आजोबांना अर्पण केले आहे. 

विशाखा यांच्या वडिलांनी मनोगत व्यक्त करताना लेखकाच्या मनावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो, तो त्याच्या अंतर्मनात झिरपत जातो त्यातून लेखक, कवी घडतो. लिहिणे सोपे नसते त्यासाठी प्रतिभावान असणे आवश्यक असते असे आवर्जून सांगितले. 

सुरुवातीस ज्येष्ठ  साहित्यिक ल. म. कडू यांनी वैभव जोशी व विशाखा विश्वनाथ यांचे स्वागत करून गमभन प्रकाशनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे समर्पक सूत्रसंचालन स्वाती कांबळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवितासंग्रहातील आशयघन कवितांचे प्रभावशाली अभिवाचन करून प्राची कुलकर्णी-गरूड, अक्षय वाटवे, प्राची रेगे आणि केतन धस यांनी काव्यप्रेमींची उत्स्फूर्त दाद मिळविली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा