29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषतेलंगणाच्या राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन यांचा राजीनामा!

तेलंगणाच्या राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन यांचा राजीनामा!

लोकसभा निवडणूक लढवण्याची अटकळ

Google News Follow

Related

तेलंगणाच्या राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तामिळीसाई यांनी पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचाही राजीनामा दिला आहे.सुंदरराजन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.तेलंगणा राजभवनाने एक निवेदन जारी करत याची माहिती दिली. दरम्यान, तमिळनाडूतून तामिळीसाई सुंदरराजन लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तेलंगणा राजभवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेलंगणाचे माननीय राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल डॉ. श्रीमती तामिळीसाई सुंदरराजन यांनी राजीनामा दिला आहे.हा राजीनामा भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

ताबडतोब आत्मसमर्पण करा, सर्वोच्च न्यायालयाचे आप नेते सत्येंद्र जैन यांना आदेश!

एल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!

कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!

‘निवडणूक रोखे कोणी दिले, माहीत नाही’

दरम्यान, आतापर्यंत लोकसभा निवणुकीसाठी भाजपकडून दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून तिसऱ्या यादीची प्रतीक्षा आहे.भाजपच्या तिसऱ्या उमेदवारांच्या यादीत तामिळीसाई सुंदरराजन यांचे नाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरराजन या उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी किंवा चेन्नई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

सुंदरराजन २०१९ पर्यंत तामिळनाडू भाजपच्या प्रमुख होत्या.यानंतर त्यांची सप्टेंबर २०१९ मध्ये तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. किरण बेदी यांना हटवल्यानंतर त्यांना पुद्दुचेरीच्या एलजीची जबाबदारीही देण्यात आली होती.सुंदरराजन या काँग्रेसच्या कुमारी अनंतन यांच्या कन्या आहेत. राज्यपाल बनण्यापूर्वी सुंदरराजन दोन दशकांहून अधिक काळ भाजपचा भाग आहेत. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुकच्या कनिमोझी यांच्याकडून थुथुकुडीमध्ये तामिळीसाई यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा