25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरविशेषम्हणून गरज होती नव्या संसद भवनाची !...माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले...

म्हणून गरज होती नव्या संसद भवनाची !…माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले कारण

सभागृहात बसलेल्या खासदारांना अडचण होत असे

Google News Follow

Related

लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नवे संसद भवन उभारण्याची गरज का होती, यामागील कारण सांगितले आहे. संसद भवनाची इमारत वारसा वास्तू असली तरी ती १०० वर्षे जुनी होती. त्यामध्ये अनेक उणिवा होत्या. या उणिवा नव्या संसद भवनामध्ये दूर केल्या गेल्या आहेत, असे महाजन यांनी सांगितले.‘माझ्या कार्यकाळातच नव्या संसद भवनाचा प्रस्ताव पुढे आला होता. बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली होती. जागाही ठरवण्यात आली होती,’ असे त्या म्हणाल्या. जुनी संसद भवन १०० वर्षे जुनी इमारत होती. आता लोकसभेच्या जागा वाढल्या आहेत. मात्र संसद भवनामधील खुर्च्यांची संख्या वाढलेली नाही. जेव्हा सर्व खासदार उपस्थित राहात, तेव्हा खासदारांना अगदी खेटून बसावे लागे. मध्ये बसलेल्या खासदारांना तर बाहेर पडताच येत नसे, असेही त्यांनी सांगितले.

१०० वर्षे जुनी इमारत 

जुन्या संसद भवनाची इमारत १०० वर्षे जुनी असली तरी त्याचे बांधकाम चांगले आहे. एका खासदाराने तर स्वत:ला खांबपीडित खासदार असे संबोधण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये एक खांब मध्येच आला होता. त्यांना जेव्हा बोलायचे असे, तेव्हा मी त्यांना परवानगी देत असे. मग ते पुढील बेंचवर येऊन स्वत:चे म्हणणे मांडत असत. खरे तर संसदेच्या नियमानुसार, प्रत्येक खासदाराने स्वत:च्या जागेवर उभे राहूनच आपले म्हणणे मांडणे आवश्यक आहे. मात्र खांब मध्ये येत असल्याने या नियमाला अपवाद केला जाई. काही खासदार तर खांबांमुळे दिसतच नसत. त्यामुळे मी त्यांना परवानगी दिल्यावर ते पुढे येऊन बोलू शकत असत.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा योग जुळून आला

असा झाला मंत्रोच्चारांच्या निनादात दिमाखदार सेंगोल प्रतिष्ठापना सोहळा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र घराघरात पोहोचवले पाहिजे!

पंतप्रधान आज नव्या संसद भवनाचे करणार लोकार्पण

गॅसवाहिनी टाकण्यातही आल्या अडचणी 

 सुमित्रा महाजन यांनी त्यांच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक बदल केले. त्यांनी सांगितले की, जुन्या संसद भवनात स्वयंपाकघरात सुरुवातीला गॅसच्या टाक्या छतावर ठेवल्या जात. माजी लोकसभाध्यक्ष मीरा कुमार यांनीही हे पाहिले होते. त्यामुळे अपघात होण्याच्या भीतीने जेवण बाहेरून मागवण्याचे ठरवण्यात आले. मात्र चपात्या बाहेरून मागवल्या की त्या थंड होतात, अशा तक्रारी खासदारांनी केल्या. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी गॅसवाहिनी आणण्याचा प्रस्ताव आला. मात्र वारसा वास्तू असल्याने या इमारतीमध्ये तोडफोड करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे याचीही परवानगी मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला.

 

तळघरात साचायचे पाणी; पेपरलेस कारभार करण्यातही अडचणी

जुन्या संसद भवनातील तळघरात पाणी साचत असे. हे पाणी पंपाच्या मदतीने काढले जाई. संसद भवनाचा कारभार पेपरलेस व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र खासदारांकडे लॅपटॉप किंवा टॅब्लेट ठेवण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे पेपरलेसचे प्रयत्नही अर्धवट सोडून देण्यात आले. राजकीय पक्षांना खोल्या देणे क्रमप्राप्त असे. मात्र खोल्याच नाहीत तर देणार कुठून? अशा प्रकारच्या अडचणी भेडसावू नयेत, याचा विचार नव्या भवनात केला गेला आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा