33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषटायटॅनिकमधील रोझचा जीव वाचवणाऱ्या दरवाजाची किंमत ५ कोटी

टायटॅनिकमधील रोझचा जीव वाचवणाऱ्या दरवाजाची किंमत ५ कोटी

केट विंसलेटच्या ‘त्या’ ड्रेसचाही झाला लिलाव

Google News Follow

Related

जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘टायटॅनिक’ हा सिनेमा १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. या चित्रपटाने आणि यात अभिनय केलेल्या लिओनार्डो डिकॅप्रियो, केट विंसलेट यांनी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलेले आहे. आयकॉनिक चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. टायटॅनिक चित्रपटात दाखवण्यात आलेली केट विंसलेट हिने साकारलेली रोझ आणि लिओनार्डो डिकॅप्रियो याने साकारलेला जॅक यांच्या प्रेमकथेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता या आयकॉनिक चित्रपटात वापरण्यात आलेल्या काही वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे.

टायटॅनिक या चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये एका दरवाजामुळे रोझ हिचा जीव वाचतो त्या दरवाज्याचा लिलाव करण्यात आला आहे. चित्रपटाच्या शेवटी, आरएमएस टायटॅनिक बुडल्यानंतर रोझ लाकडी दरवाजाच्या मदतीने तिचा जीव वाचवते. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, हा दरवाजा ७१८,७५० डॉलर्स (सुमारे पाच कोटी रुपये) मध्ये विकला गेला आहे. हॉलिवूड रिपोर्टरच्या मते, लिलावादरम्यान अनेक चाहत्यांना वाटले की, ते फक्त लाकडी फलक आहे. तथापि, हेरिटेज ऑक्शन्स ट्रेझर्सने हे उघड केले की, हा दरवाजाच्या चौकटीचा भाग आहे जो एकेकाळी वास्तविक टायटॅनिकच्या प्रथम श्रेणी लाउंजच्या प्रवेशद्वाराच्या थेट वर अस्तित्वात होता.

केट विंसलेटच्या ‘त्या’ ड्रेसचा लिलाव

टायटॅनिक या चित्रपटात रोझची भूमिका साकारणारी अभिनेत्री केट विंसलेट हिने परिधान केलेल्या शिफॉन ड्रेसचाही लिलाव करण्यात आला. हा ड्रेस १२५,००० डॉलर्स म्हणजेच अंदाजे १.०५ कोटी रुपयांना विकला गेला. हेरिटेज ऑक्शन्सने एक निवेदन जारी केले की, या लिलावातून त्यांना १३१ कोटी रुपये मिळाले. यासह, हे प्रॉप आणि कॉस्च्युम कलेक्शनची सर्वात यशस्वी विक्री बनली आहे.

हे ही वाचा:

गरजू कैद्यांसाठी वकिलांचे ‘दर्द से हमदर्द तक’

मुख्तार अन्सारीचा प्रवास; स्वातंत्र्य चळवळ, वीरचक्र मिळविणाऱ्या कुटुंबातला मुलगा ते गुन्हेगार

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

जेम्स कॅमेरून यांनी ‘टायटॅनिक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास २७ वर्षे झाली आहेत, तरी देखील लोक आजही हा चित्रपट आवडीने पाहतात. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो, केट विंसलेट, बिली झेन, कॅथी बेट्स, बिल पॅक्सटन, ग्लोरिया स्टुअर्ट या कलाकारांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. १९९८ च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘टायटॅनिक’ने १४ नामांकनांपैकी ११ पुरस्कार जिंकले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा