26.4 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेष‘व्होकल फॉर लोकल’मधून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल!

‘व्होकल फॉर लोकल’मधून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल!

‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या १३९ व्या भागातून स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळत असून, स्थानिक कारागीर आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पारंपरिक शेती, खादी, पर्यावरण संवर्धन, आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संशोधनातील विविध उपक्रमांचा उल्लेख केला. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, पारंपरिक कौशल्यांचे संवर्धन आणि स्वदेशी वस्तूंच्या वापरातून देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ

बिहारमधील पूर्णियाचे मखाने ग्रीसपर्यंत, तर कर्नाटकातील कलबुर्गीची तूरडाळ मालदीवपर्यंत पोहोचत असल्याचे मोदी यांनी सांगितले. उत्पादनाच्या गुणवत्तेसोबत आकर्षक पॅकेजिंगही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील ‘शबरी नॅचरल्स’च्या मध, महुआ, चारोळी आणि बांबू उत्पादनांच्या पॅकेजिंगला आदिवासी कलेच्या वापरामुळे जपानचा ‘गुड डिझाइन अवॉर्ड’ मिळाला आहे. कर्नाटकातील स्टार्टअप बांबू आणि शेतीतील अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्य तयार करत आहे. पंजाबमध्ये ‘खेती विरासत मिशन’च्या ‘नव-त्रिंजन’ उपक्रमातून रसायनविरहित नैसर्गिक कापूस शेती आणि पारंपरिक विणकामाला प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे पर्यावरण संरक्षणासोबत महिलांचे सक्षमीकरणही होत आहे.

जलसंवर्धन आणि खादीला प्रोत्साहन

उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथे ग्रामस्थ आणि प्रशासनाने पावसाचे पाणी अडवणे, भूजल पुनर्भरण आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून हेवल नदी व नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले. गांधी जयंतीला खादी ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री २८ कोटी रुपयांवर गेली असून, गेल्या वर्षीपेक्षा १.५ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे मोदी यांनी सांगितले.

आरोग्यसेवा, विज्ञान आणि एकतेवर भर

‘ई-संजीवनी’च्या माध्यमातून देशात सुमारे ५० कोटी टेलिकन्सल्टेशन झाल्याचे त्यांनी सांगितले. अंदमान-निकोबारमधील जरावा जमातीच्या एका मुलाला या सेवेच्या मदतीने न्यूमोनियाचे निदान आणि उपचार मिळाले. देशातील सुमारे १.९ लाख आयुष्मान आरोग्य मंदिरांचाही त्यांनी उल्लेख केला.

हे ही वाचा:

युरोपमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात हिंसक आंदोलनांचा भडका

प्रोजेक्ट हिमसरोवर; तळे राखी, तो पाणी चाखी!

धर्मांतरासाठी दबाव, विरोध करताच नर्सिंग विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला

“पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा जिवंत ठेवला”

२०२३ मधील आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष, आयआयटी मद्रासमधील मेंदू संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानातील स्टार्टअप्सचेही त्यांनी कौतुक केले. ‘फायबर ऑप्टिक्सचे जनक’ नरिंदर सिंह कपानी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त तरुणांनी शास्त्रज्ञांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ३१ ऑक्टोबरच्या सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे आवाहन केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा