ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी जम्मू आणि काश्मीरबाबत भाष्य केले आहे. संपूर्ण जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीनीकरण व्हावे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यापूर्वी काश्मीरच्या काही भागांवर पाकिस्तानचा कब्जा करण्यास विरोध केला आहे, असे ते म्हणाले. जयपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी कलम ३७० हटवण्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले की ते गेल्या अनेक दशकांपासून कलम ३७० हटवण्याचे समर्थक आहेत.
जयपूरमधील कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये हाय-टी कार्यक्रमात बोलताना ब्लॅकमन म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरवरील त्यांची भूमिका ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१९ मधील निर्णयाशी जोडलेली अलीकडील घटना नाही, तर १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या घटनांमध्ये, विशेषतः खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनाशी संबंधित आहे. “पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जाहीरनाम्यात कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, १९९२ मध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांना जम्मू आणि काश्मीरमधून हाकलून लावण्यात आले होते तेव्हापासून मी ही मागणी केली होती,” असे ब्लॅकमन म्हणाले. पुढे ते म्हणाले की, त्यावेळी एक मोठी बैठक आयोजित करून लोकांना सांगितली होते, हे चुकीचे असून अन्याय्य आहे. लोकांना त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्या वडिलोपार्जित घरातून बाहेर काढले जात आहे.
हे ही वाचा..
उमर खालिद, शर्जिल इमाम राहणार तुरुंगातच
सोमनाथ मंदिर स्वाभिमानाचे प्रतिक… पंतप्रधान मोदींचा विशेष लेख
‘धुरंधर’ भारताच्या पहिल्या पाच चित्रपटांच्या पंक्तीत
भारतावर आणखी कर लादणार! ट्रम्प यांनी का दिला इशारा?
ब्लॅकमन म्हणाले की त्यांनी या प्रदेशातील दहशतवादाचा सातत्याने निषेध केला आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांवर पाकिस्तानच्या नियंत्रणाची टीका केली आहे. “मी केवळ होत असलेल्या दहशतवादाचा निषेध केला नाही तर जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांवर पाकिस्तानने केलेल्या बेकायदेशीर कब्जाचाही निषेध केला आहे,” असे ते म्हणाले. आपल्या मूळ भूमिकेचा पुनरुच्चार करताना ते पुढे म्हणाले, “मी सुरुवातीपासूनच म्हटले आहे की, संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हे भारतात पुन्हा एकत्र आले पाहिजे.” ब्लॅकमन यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता, ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.







