33 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरविशेष१२ दिवसांत 'द केरळ स्टोरी' १५० कोटींच्या कल्बमध्ये सामील!

१२ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ १५० कोटींच्या कल्बमध्ये सामील!

'द केरळ स्टोरी' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

Google News Follow

Related

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर वादाच्या गर्तेत सापडला होता. मात्र, सिनेमा प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात या सिनेमाला चांगलेच यश आले आहे. काही दिवसांपूर्वीचं या सिनेमाने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी एक यशाचा टप्पा या सिनेमाने पार केला आहे.

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने १२ व्या दिवशी १५० कोटींचा आकडाही पार केला आहे. तसेच २०२३ वर्षाच्या ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत या सिनेमाचा समावेश झाला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. त्यामुळे आता येत्या आठवड्याअंती हा सिनेमा २०० कोटींच्या कल्बमध्ये सामील होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. २०२३ मधील ‘द केरळ स्टोरी’ हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे.

‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले असून आजही या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत रिलीजच्या १२ दिवसांत या सिनेमाने १५६.८४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

हे ही वाचा:

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर १० लाखांचा दंड

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आसामच्या वादग्रस्त ‘लेडी सिंघम’चा अपघाती मृत्यू

‘द केरला स्टोरी’मध्ये द्वेषयुक्त भाषण; प. बंगाल सरकारचा दावा

सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि लिखित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात तीन बिगर मुस्लिम महिलांची कथा आहे. ज्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना इसिस या दहशतवादी संघटनेत सामील करण्यात आले होते. या चित्रपटात अदा शर्मासह योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्याही भूमिका आहेत. वादाच्या भोवऱ्यात हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,018अनुयायीअनुकरण करा
75,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा