31 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरविशेष शेतकरी आंदोलनात दिसला खलिस्तानी ध्वज! 

 शेतकरी आंदोलनात दिसला खलिस्तानी ध्वज! 

चर्चांना उधाण

Google News Follow

Related

रद्द करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या पूर्वीच्या शेतकरी आंदोलनांप्रमाणेच खलिस्तानी घटकांनी सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये घुसखोरी केली आहे. कारण भिंद्रनवाले यांचे चित्र असलेला खलिस्तानी ध्वज शेतकरी आंदोलनाच्या ट्रॅक्टरवर दिल्लीकडे कूच करताना दिसत असल्यामुळे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आज पंजाब, हरियाणा आणि इतर काही राज्यांतील शेतकऱ्यांनी “चलो दिल्ली” शेतकरी निषेधाचा भाग म्हणून दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका ट्रॅक्टरवर खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचे चित्र असलेला ध्वज दिसल्याने अशी चर्चा सुरु झाली आहे.  व्हिडिओमध्ये १५ सेकंद ते १७  सेकंदांपर्यंत एक लाल-टूर ट्रॅक्टर पास झाला ज्यावर भिंद्रनवालेच्या चित्रासह पिवळ्या रंगाचा त्रिकोणी ध्वज होता. यापूर्वी केंद्र सरकारने चंदीगडमध्ये शेतकरी संघटनांसोबत त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेतली होती. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल आणि कृषी मंत्री अर्जुन मुंडा हे शेतकरी नेत्यांशी चर्चा करणाऱ्या टीममध्ये होते. पंजाबचे मंत्री कुलदीपसिंग धालीवालही यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा..

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करू!

इंदूरमध्ये भिकाऱ्याने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख रुपये!

वक्फच्या वादग्रस्त मालमत्तेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर

मंत्री आणि शेतकरी नेते यांच्यात पाच तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. मात्र यामध्ये कसलाही मार्ग निघाला नाही. शेतकरी नेत्यांनी शंभू, खनौरी, डबवली हद्दीतून दिल्लीकडे कूच करणार असल्याचे जाहीर केले. किसान मजदूर संघर्ष मोर्चाचे सरवनसिंग पंढेर यांनी मंगळवार, १३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शेतकरी दिल्लीकडे कूच करतील, अशी घोषणा केली होती. एमएसपी हमी कायदा आणि कर्जमाफी या मागण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. रद्द करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या पूर्वीच्या शेतकरी आंदोलनांप्रमाणेच खलिस्तानी घटकांनी सध्याच्या आंदोलनांमध्येही घुसखोरी केली आहे.

प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नून यांनी यापूर्वीच पंजाबमधील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या विरोधात भडकावणारा व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, तुम्हाला केंद्र सरकारकडून त्यांना विचारून काहीही मिळणार नाही. तुम्हाला दिल्ली जिंकायची आहे. व्हिडिओ दरम्यान वापरलेल्या प्रतिमेत, “मोदी हाऊस” लिहिलेली एक इमारत होती ज्यावर “खलिस्तान ध्वज उंच करा” असा संदेश लिहिलेला होता, खलिस्तान समर्थकांना पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी खलिस्तान ध्वज उभारण्यासाठी चिथावणी दिली होती.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा