29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषकोरियन मुलीला 'या' दोन भारतीय मुलांनी केली होती मदत

कोरियन मुलीला ‘या’ दोन भारतीय मुलांनी केली होती मदत

याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

Google News Follow

Related

ह्योजांग पार्क या कोरियन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांना अटक केली होती. पोलिसांत तक्रार न देता पोलिसांनी ट्विटरवर व्हिडीओ पहिल्यानंतर स्वतःहून करवाई केली आहे. पार्क हिला तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यासाठी ज्या दोन भारतीयांनी मदत केली त्यांचे पार्क हिने आभार मानले आहेत. आदित्य आणि अथर्व या दोन भारतीय तरुणांनी पार्क हिला मदत केली होती.

काही दिवसांपूर्वी ह्योजांग पार्क खारच्या रस्त्यावर व्हीडिओ करत होती, तेव्हा दोन तरुण तिच्याजवळ आले आणि त्यांनी तिला आपल्या कारमध्ये बसण्यासाठी गळ घालायला सुरुवात केली. तिने नकार दिला तर तिच्या खांद्यावर जबरदस्तीने हात टाकून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा पार्क हिच्या फोनमध्ये व्हिडिओ कैद झाला होता. तो व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत मोबीन चांद व मोहम्मद नकीब या दोन तरुणांना अटक केली. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

कांदिवलीतील शाळेत विद्यार्थ्याने दुसऱ्या मुलावर केला चाकुने हल्ला

चित्रा वाघ यांच्या मागणीनंतर ते बेकायदेशीर चर्च पाडण्यात आले

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

अतिसुंदर; गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान

तक्रारीशिवाय झालेली कारवाई पाहून पार्क हिने पोलिसांचे आभार मानले. तसेच तिने भारताच्या यंत्रणांचे कौतुक केले होते. त्यानंतर तिला याप्रकरणी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्यासाठी प्रोत्साहित केलेल्या दोन भारतीय तरुणांची नावे सांगितली आहेत. पार्कने यासंदर्भात ट्विट केले आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यात आणि मला रस्त्यावर वाचवणार्‍या दोन भारतीय गृहस्थांसोबत जेवण असं तिने ट्विट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा