28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषप्रशांत कारुळकर यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डससह तीन पुरस्कार

प्रशांत कारुळकर यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डससह तीन पुरस्कार

Google News Follow

Related

कोविड १९च्या संकटकाळात विविध समाजघटकांना मदतीचा हात पुढे करून सावरणारे, त्यांना आधार देणारे कारुळकर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत कारुळकर यांना या प्रशंसनीय कार्याबद्दल तीन वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. द वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स (लंडन), साऊथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि इंडो-यूके कल्चरल फोरम अशा तीन प्रथितयश संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे खास मानपत्र देऊन कौतुक केले.

कोविड १९मुळे जगभरात हाहाकार उडाला. अशा संकटकाळात प्रशांत कारुळकर यांनी अनेक गरजवंतांना अन्नपदार्थ, औषधे, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन बेड्स आदि वस्तू उपलब्ध करून देत त्यांना दिलासा दिला. या कठीण परिस्थितीत त्यांना धीर दिला. सढळ हस्ते मदत करून एक सामाजिक संदेश पोहोचविला. कोरोनाच्या या काळातही स्वतःला या कार्याला वाहून घेत एक आदर्श निर्माण करणाऱ्या प्रशांत कारुळकर यांना गुरुवारी द वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने मानपत्र देऊन मुंबईतील कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याशिवाय, दिव्यांग गांधी,  उपाध्यक्ष, गुजरात यांच्या हस्ते त्यांना साऊथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे मानपत्र प्रदान करण्यात आले तर  नीरव शाह यांच्या उपस्थितीत इंडो-यूके कल्चरल फोरमचे सन्मानपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. फरहा अहमद सुलताना, महाराष्ट्र अध्यक्ष यांनीही त्यांना व्हीडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. साऊथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्र (एमएसएमई), आरोग्य सेतू आणि बिझनेस कोऑर्डिनेटिंग असोसिएशन ऑफ सार्क यांचा पाठिंबा आहे.

हे ही वाचा:

‘डॉक्टर डे’ च्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

आरटीई राखीव जागांवरील प्रवेशाचा उडालाय बोजवारा

आरोग्य क्षेत्राचे बजेट दुप्पट केले

हल्लेखोरासोबत पडळकरांवरही गुन्हा

द वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने आतापर्यंत गृहमंत्री अमितभाई शहा, पत्रकार रजत शर्मा, उत्तर प्रदेशचा राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रूपानी, शाहनवाज हुसेन आदिंना सामाजिक कार्यासाठी गौरविले आहे.

साऊथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलने दिला आहे.

जगभरातील १०० देशांतील संस्था आणि लोकांना या मोहिमेच्या अंतर्गत गौरविण्यात आले. द वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसच्या माध्यमातून या गुणीजनांना मानपत्र देऊन त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ही जगभरातील विविध खंडांत कार्यरत असलेली संस्था आहे. जागतिक विक्रम करणाऱ्यांना गौरविण्याचे कार्य ही संस्था करत असते. शिवाय, मानवता, वैश्विक सौहार्द यात अतुलनीय कार्य करणाऱ्यांनाही ती सन्मानित करत असते.

द वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने पत्र पाठवून प्रशांत कारुळकर यांचे अभिनंदन केले आहे.

‘समाजासाठी मदतीचा हात पुढे करताना त्याचे कुणी कौतुक करावे, ही भावना नसते. पण कुणी या कार्याची दखल घेतलीच तर त्याबद्दल कृतज्ञ आहे. धन्यवाद,’ अशा शब्दांत प्रशांत कारुळकर यांनी पुरस्कारांनी सन्मानित करणाऱ्या तिन्ही संस्थांचे विनम्रपणे आभार मानले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा