28.2 C
Mumbai
Thursday, July 16, 2026
घरविशेषआषाढी वारीला गालबोट; जेजुरीत ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

आषाढी वारीला गालबोट; जेजुरीत ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

सहा वारकरी जखमी

Google News Follow

Related

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पायी वारी करत आहेत. मात्र, या पवित्र वारीवर सोमवार, १३ जुलै रोजी सकाळी जेजुरी परिसरात झालेल्या भीषण अपघातामुळे शोककळा पसरली. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात हा अपघात घडला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेमुळे अनेक वारकरी जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. उपचारादरम्यान या तिघी महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

भायखळ्यात सात वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षा रक्षकाकडून लैंगिक अत्याचार

बँकॉकमध्ये पबला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू

यास्तिकाच्या शतकाने इतिहास रचला

ब्रह्मपुत्रावर चीनचा ‘टाईम बॉम्ब’?

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रविवारी जेजुरी येथे मुक्कामी होती. सासवडहून प्रस्थान केल्यानंतर सोमवारी सकाळी वारकरी जेजुरीच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. या काळात वाहतुकीसाठी रस्त्याची एक बाजू खुली ठेवण्यात आली होती. त्याच मार्गावरून आलेल्या ट्रकने नियंत्रण गमावून मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा