28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरविशेषसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी देणार

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Google News Follow

Related

संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारी आढावा बैठक वर्षा निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीला पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, सुहास कांदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो वारकरी येत असतात. संत परंपरेतील विश्वगुरु अशी ओळख असणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा पौषवारी सोहळा हा आषाढी आणि कार्तिकी वारी इतकाच भव्य स्वरुपात साजरा होत असतो.

हेही वाचा..

‘तो’ वादग्रस्त भाग सहावीच्या पुस्तकातून काढला

शुभमन गिलचे तिसरे कसोटी शतक; इंग्लंडला हव्यात ३३२ धावा

धुळ्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त!

२००४ ची चूक पुन्हा नको; लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना इशारा!

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात होणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या सोहळ्याचे नियोजन करतांना प्रशासनाने याला नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून या सोहळ्याकडे पाहावे. या यात्रौत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना स्टिकर पुरवून अशा वाहनांना टोल माफी देण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्यातून नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा