28 C
Mumbai
Sunday, December 4, 2022
घरविशेषराज्यातील २५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

राज्यातील २५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

Google News Follow

Related

राज्यातील पोलिसांच्या सर्वसामान्य बदल्याचा मुहूर्त सरकारला मिळाला आहे. गुरुवार, २० ऑक्टोबर रोजी पोलीस उपायुक्ताच्या बदल्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत राज्यातील २५ पोलीस उपायुक्तांच्या विविध जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.

परमबीर सिंग यांच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांच्याकडे विशेष सुरक्षा विभागाची (व्हीआयपी सुरक्षा) जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबईतील परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त निलोतपल यांची गडचिरोली पोलिस अधीक्षक या पदावर बदली करण्यात आलेली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांना रत्नागिरी पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आलेली आहे. औरंगाबाद ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तर सातारा पोलीस अधीक्षक म्हणून शेख समीर अस्लम यांची वर्णी लागली आहे.

हे ही वाचा:

पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस

पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, पोलीस अधीक्षक पोलीस अकादमी नाशिक शिरीष सरदेशपांडे हे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, राकेश ओला एसीबी नागपूर ते पोलीस अधिक्षक अहमदनगर, एम राजकुमार लोहमार्ग नागपूर ते जळगाव पोलीस अधीक्षक, संदीप गिल राज्य राखीव दल हिंगोली ते हिंगोली पोलीस अधीक्षक, श्री कृष्ण कोकाटे मुंबई पोलीस उपायुक्त ते नांदेड पोलीस अधीक्षक, ठाणे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील नागपूर पोलीस प्रशिक्षण,

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,947चाहतेआवड दर्शवा
1,978अनुयायीअनुकरण करा
53,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा