अमेरिकेने भारतावर लावलेल्या ५०% आयात शुल्कावरून (टॅरिफ) भारतीयांमध्ये संताप आहे. टॅरिफमुळे भारत-अमेरिका व्यापारावर परिणाम होणार याची सरकारला जाणीव आहे. मात्र, सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान, अमेरिकेने भारतावर लावलेल्या ५०% कर आकारणीबद्दल पॉली मेडिक्योर लिमिटेड (POLYMED) चे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू बैद यांनी चिंता व्यक्त केली आहे.
एएनआयशी संवाद साधताना हिमांशू बैद म्हणाले, “सध्या या ५०% टॅरिफबाबत मी चिंतित आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये भारताची अमेरिका दिशेने निर्यात सातत्याने वाढत होती. वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये जवळपास ७०० मिलियन डॉलर्सची निर्यात झाली आहे. कोविड काळात हीच निर्यात सुमारे ३०० मिलियन डॉलर्स होती. यामधून आपण खूप मोठी प्रगती केली आहे.”
परंतु या ५०% कर आकारणीमुळे, मला वाटते की अमेरिकेला निर्यात करणाऱ्या कंपन्यांना हा खर्च सहन करणे खूप कठीण होईल आणि याचा परिणाम अमेरिकेतील व्यवसायाच्या भविष्यातील वाढीवर होईल. त्यांनी भारताच्या वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील स्थितीबाबत सांगितले की, “भारत अजूनही वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. उत्पादन आणि आयात यामधील प्रमाण सध्या जवळजवळ सारखंच आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये आपला प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे आयात कमी करणे हे असायला हवे.”
ही परिस्थिती मेडिकल डिव्हाइसेस क्षेत्रासाठी मोठं आव्हान ठरू शकते, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारकडून धोरणात्मक समर्थनाची गरज असल्याचेही सूचित केले. दरम्यान, ट्रम्पच्या टॅरिफ धोरणावर सरकार मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
#WATCH | On 50% tariff by the US on India, Managing Director at Poly Medicure Limited (POLYMED), Himanshu Baid says, "I am worried about the 50% tariff right now. What we have seen in last 5 years, India's exports to the US have been constantly increasing. In FY25, we have… pic.twitter.com/CfwxzvFmfj
— ANI (@ANI) August 30, 2025







