तुर्कीच्या ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबीचा भारतातील मध्यस्थता अर्ज फेटाळण्यात आला आहे. ही माहिती सेलेबीच्या प्रवर्तक तुर्की कंपनीने एक्सचेंज फायलिंगद्वारे दिली. सेलेबीने अहमदाबाद इंटरनॅशनल एअरपोर्टकडून करार रद्द केल्यानंतर अहमदाबादच्या वाणिज्यिक न्यायालयात मध्यस्थता अर्ज दाखल केला होता. जेव्हा दोन कंपन्यांमध्ये वाद निर्माण होतो, तेव्हा तो वाद सोडवण्यासाठी एक पक्ष वाणिज्यिक न्यायालयात मध्यस्थता अर्ज (Arbitration Application) दाखल करतो.
सेलेबी ग्राउंड हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ६१% हिस्सा असलेल्या सेलेबी एअरपोर्ट होल्डिंगने सांगितले, २७ मे रोजी अदाणी अहमदाबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडविरोधात दाखल केलेला मध्यस्थता अर्ज २ जून रोजी फेटाळण्यात आला. कंपनीने यावर पुढे सांगितले की, आता या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात अपील दाखल करू.
हेही वाचा..
आयसीइए कडून उद्योग-व्यापी उपक्रमाची सुरूवात
देशहित काँग्रेससाठी महत्त्वाचं नाही
पाकिस्तानात भूकंप आला आणि खचलेली भिंत ओलांडून कैदी फरार!
भारत सरकारने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर आणि त्यात २६ पर्यटकांच्या मृत्यूनंतर, तुर्कीच्या पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर, सेलेबीच्या भारतीय विमानतळांवरील सुरक्षा मान्यता रद्द केली आहे. नागर विमानन मंत्रालयाने म्हटले की,
राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुरक्षा मान्यता तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे.”
नागर विमानन सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या निर्देशानुसार, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरील सेलेबीसोबतचा ग्राउंड हँडलिंग आणि कार्गो ऑपरेशन करार रद्द केला. अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्सनेही मुंबई आणि अहमदाबाद एअरपोर्टवरील सेलेबीसोबतचा करार तात्काळ प्रभावाने समाप्त केला. सरकारच्या आदेशानंतर, बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेलेबी एव्हिएशनचे ग्राउंड हँडलिंग ऑपरेशन्स निलंबित करण्यात आले.
