28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरविशेष१२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस येणार?

१२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस येणार?

Related

भारतातील अग्रगण्य औषध कंपनी असलेल्या झायडस कॅडीला कंपनीकडून त्याच्या झायकॉव्ह-डीया लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) तशा प्रकारची विनंती करण्यात येणार असून या लसीला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली डीएनए आधारित लस असणार आहे.

भारतात आतापर्यंत तीन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडीला च्या झायकॉव्ह-डीलसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास ती देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस असणार आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची आकडेवारी तयार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी झायडस कॅडीला ने २८,००० स्वयंसेवकांचा वापर केला होता. त्याचा अहवाल आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे जमा करण्यात येणार आहे. ही लस १२ ते १८ वयोगटातील बालकांसाठीही उपयुक्त असेल असं सांगण्यात येतंय.

झायडस कॅडीला ची झायकॉव्ह-डीही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद स्थित या कंपनीच्या लसीच्या साठवणुकीसाठी दोन ते चार डिग्री सेल्सियस तापमानाची गरज असते. त्यामुळे त्याच्या साठवणुकीसाठी कोल्ड चेनची आवश्यकता नाही. त्यामुळे देशभरात त्याचे वितरण सुलभपणे होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत देशात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन, सीरमची कोविशिल्ड आणि रशियन स्पुटनिक व्ही या लसींना परवानगी मिळाली आहे. यात आता झायकॉव्ह-डीची भर पडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

मुंबईत निर्बंध शिथील करा, व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारकडे मागणी

पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन

महापालिकेचे खासगीकरण होतेय का?

कसोटी विश्वचषक अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसात वाहून

कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये एक महत्वाचं हत्यार म्हणून पुढं येत असलेल्या मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या चाचणीला परवानगी मिळावी अशी विनंती झायडसने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे या आधीच केली आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीचा वापर अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या डोसनंतर कोरोना रुग्णाला रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते. तसेच या डोसमुळे कोरोना होण्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा