भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कमधील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार त्या वृद्धापकाळामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्यांशी झुंज देत होत्या. प्रख्यात सिनेदिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या त्या पत्नी होत.
संध्या शांताराम त्यांच्या मोहक अभिनयासाठी आणि विशिष्ट अशा नृत्यशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी भारतीय सिनेमाच्या सुवर्णयुगात अशी परंपरा निर्माण केली की, आजही त्यांच्या भूमिकांचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.
हे ही वाचा:
डाव्या पक्षांकडून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांचा बचाव
जीएसटीचा भार हलका झाल्यावर नवरात्रीत दशकातील सर्वोत्तम खरेदी
गाझा पट्टीत झालेल्या इस्रायली गोळीबारात सहा जणांचा मृत्यू
संभलमधील मशीद पाडण्यास स्थगिती देण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली
‘पिंजरा’ ते ‘दो आंखें बारह हाथ’ – एक कलाकार आणि एक प्रेरणा
संध्या या सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पत्नी होत्या. त्या केवळ त्यांच्या जीवनसाथी नव्हत्या, तर त्यांच्या सर्जनशील प्रेरणाही होत्या. त्यांनी मराठी चित्रपट ‘पिंजरा’ मधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भावविभोर केले. या चित्रपटात त्यांच्या . ‘दो आंखें बारह हाथ’ या चित्रपटात त्यांनी अभिनय आणि नृत्याचा अद्भुत संगम घडवून आणला आणि बहुआयामी प्रतिभेचे दर्शन घडवले.
‘नवरंग’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ – नृत्यातून अभिनयाचा उत्कर्ष
संध्या यांची अभिनय कारकीर्द विविध भाषांमध्ये विखुरलेले होते. ‘नवरंग’ चित्रपटातील ‘अरे जा रे हट नटखट’ या गाण्यातील त्यांचा अभिनय आजही अविस्मरणीय मानला जातो. तर ‘झनक झनक पायल बाजे’ मध्ये त्यांनी आपल्या शास्त्रीय नृत्यकौशल्याचे अप्रतिम प्रदर्शन केले. या भूमिकेसाठी त्यांनी कठोर शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण घेतले होते. हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाला आणि चार फिल्मफेअर पुरस्कार देखील पटकावले.
शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार – चाहत्यांचा भावनिक निरोप
त्यांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबीय, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि चाहत्यांची मोठी उपस्थिती होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान त्यांच्या चित्रपटांमधून आणि त्यांच्या प्रभावी अभिनयातून सदैव जिवंत राहील, अशी श्रद्धांजली सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आली.
चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी “X” (पूर्वी ट्विटर) वर श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले की, “दिग्गज अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. पिंजरा, दो आंखें बारह हाथ, नवरंग आणि झनक झनक पायल बाजे मधील त्यांचे अजरामर अभिनय आजही स्मरणात आहेत. त्यांच्या विलक्षण प्रतिभेने आणि मोहक नृत्यकौशल्याने चित्रपटजगतात अमिट ठसा उमटवला आहे.







