28.6 C
Mumbai
Saturday, July 18, 2026
घरविशेष'विक्रम-1' झेपावले; भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचे नवे पर्व

‘विक्रम-1’ झेपावले; भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचे नवे पर्व

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

Google News Follow

Related

भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार असून, हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस (Skyroot Aerospace) विकसित ‘विक्रम-1’ या भारतातील पहिल्या खासगी कक्षीय (ऑर्बिटल) रॉकेटच्या प्रक्षेपणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीला शुभेच्छा दिल्या आहेत. या मोहिमेला भारताच्या अंतराळ प्रवासातील “ऐतिहासिक नवे पर्व” असे संबोधत त्यांनी देशवासीयांना, विशेषतः तरुणांना, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “आज सकाळी ११.३० वाजता स्कायरूट एरोस्पेस ‘विक्रम-1’ या भारताच्या पहिल्या खासगी विकसित प्रक्षेपण वाहनाचे पहिले कक्षीय उड्डाण करणार आहे. हा भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, या मोहिमेतून भारतीय तरुणांचे कौशल्य, जिद्द आणि उद्योजकीय क्षमता दिसून येते. तसेच केंद्र सरकारच्या अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे नवकल्पना आणि उद्योगांना नवी संधी मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी विक्रम-1 उंच भरारी घेऊन इतिहास घडवो आणि नव्या पिढीतील संशोधकांना प्रेरणा देवो, अशा शब्दांत स्कायरूटच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यांनी नागरिकांना #IndiaWithVikram1 या हॅशटॅगसह या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.

‘मिशन आगमन’ का आहे ऐतिहासिक?

‘विक्रम-1’चे पहिले उड्डाण ‘मिशन आगमन’ या नावाने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ११.३० वाजता होणार आहे. भारतातील एखाद्या खासगी कंपनीने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेल्या रॉकेटद्वारे उपग्रह कक्षेत पाठवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या मोहिमेच्या यशामुळे भारत जागतिक लघु-उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेत अधिक मजबूत स्थान निर्माण करू शकतो.

काय आहे ‘विक्रम-1’ची वैशिष्ट्ये?

सुमारे २४ मीटर उंच असलेले ‘विक्रम-1’ हे चार टप्प्यांचे (Four-stage) प्रक्षेपण वाहन आहे. त्याची रचना हलक्या कार्बन-कॉम्पोझिट साहित्यापासून करण्यात आली असून त्यात तीन घन इंधन (Solid Fuel) टप्पे आणि अंतिम द्रव इंधनावर चालणारे ऑर्बिटल अॅडजस्टमेंट मॉड्यूल आहे. हे रॉकेट 450 किलोमीटर उंचीवरील लो-अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) 350 किलोग्रॅमपर्यंतचा पेलोड पोहोचवू शकते.

हे ही वाचा:

लॉर्ड्समधील सामना रोहितचा अखेरचा नाही!

वांगचुक यांना हटवल्यानंतर अभिजीत दिपके आमरण उपोषणावर

इराणमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांत ३८ ठार; ४०० हून अधिक जखमी

दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उचलून नेले रुग्णालयात

‘मिशन आगमन’ ही प्रामुख्याने तंत्रज्ञान पडताळणी मोहीम आहे. या उड्डाणादरम्यान रॉकेटची प्रोपल्शन प्रणाली, मार्गदर्शन (Guidance), नेव्हिगेशन, स्टेज सेपरेशन आणि इतर महत्त्वाच्या यंत्रणांची चाचणी घेतली जाणार आहे. याशिवाय भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे अनेक तंत्रज्ञान पेलोडही या रॉकेटद्वारे अंतराळात पाठवले जाणार आहेत.

खासगी अंतराळ क्षेत्रासाठी मोठी झेप

२०१८ मध्ये इस्रोचे माजी शास्त्रज्ञ पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांनी स्कायरूट एरोस्पेसची स्थापना केली होती. २०२२ मध्ये ‘विक्रम-S’ या भारताच्या पहिल्या खासगी सब-ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून कंपनीने इतिहास रचला होता. आता ‘विक्रम-1’ यशस्वी झाल्यास भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी नवे दालन खुले होईल आणि देशाची व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा