28.7 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरविशेषविनायक मेटे यांच्या चालकाला अटक

विनायक मेटे यांच्या चालकाला अटक

Google News Follow

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा ऑगस्ट महिन्यात अपघाती निधन झाले. मेटे यांच्या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू होती. सर्व तपासातून कार चालक दोषी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी मेटे यांचा कार चालक एकनाथ कदमवर सीआयडीकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज या अपघाताला जबाबदार असलेल्या कार चालक एकनाथ कदम याला अटक करण्यात आली आहे.

१४ ऑगस्ट रोजी विनायक मेटे बीड जिल्ह्यातून मुंबईकडे कारने येत होते. पहाटे ५.३० वाजता मुंबई-पुणे महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ मेटे यांची कार अचानक ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात जखमी झालेल्या मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

त्यांच्या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरु होती. चौकशीत विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समितीसुद्धा तयार करण्यात आली होती. या समितीत आयआरबीचे अभियंता आणि इतरांचा समावेश होता.

हे ही वाचा:

इराणमध्ये हिजाबविरोधातील आंदोलन पेटलेलेच; गोळीबारात दोन महिला मृत्युमुखी

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

या चौकशीत अपघात चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. अपघात आणि मेटेंच्या आकस्मिक मृत्यूसाठी कदम याला जबाबदार धरण्यात आले आहे. कदम याच्यावर दाखल केलेल्या कलमानुसार त्याला दोन ते चार वर्ष शिक्षा होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा