22 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरराजकारण'राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही'

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

अतुल भातखळकर यांनी राहूल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो सुरु आहे. यादरम्यान, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून राहुल गांधी यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतं आहे. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राहूल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत राहुल गांधी हा मनोरुग्ण आहे, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही अशा शब्दांत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधी हा मनोरुग्ण आहे, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही. त्याला अंदमान पर्व समजणार नाही त्याची उडी थायलँड पर्यंतच. पांढऱ्या पावडरीचा परिणाम दुसरे काय? तर पुढच्या ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले, तुरुंगात सिगरेट फुंकण्यापासून बॅडमिंटन खेळण्यापर्यंत सर्व सोयी उपभोगणाऱ्या नेहरुंच्या पणतूला सावरकरांचा त्याग समजवावा तरी कसा? असा सवाल करत भातखळकर यांनी टीका केली आहे.

तसेच राहुल गांधी यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झाला होता. ज्यामध्ये राष्ट्रगीत समजून दुसऱ्या गीतासाठी राहुल गांधी उभे होते. यावरून सुद्धा भातखळकरांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

आम्हाला परिवार नाही का? करमुसेंचा आव्हाड यांना सवाल

११ वर्षे सावरकरांसारखा यातना भोगणारा काँग्रेसचा नेता दाखवा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक डेडलाईनच्या आधीच होणार पूर्ण

महिंद्रा एसयूव्हीला ‘लाख लाख’ शुभेच्छा

राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली असताना आदित्य ठाकरे त्यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यामुळे भातखळकरांनी ठाकरे गटावर सुद्धा निशाणा साधला आहे. उद्धव सेना लाज कोळून प्यायली आहे की, त्यांच्या घरबशा नेत्यांच्या कानापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान गेलेला नाही? असा सवाल भातखळकरांनी ठाकरे गटाला केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
2,004अनुयायीअनुकरण करा
61,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा